महाराष्ट्र
मा.आ. प्रशांत परिचारक यांची पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदी बिनविरोध निवड झाल्याने सिद्धापूर ग्रामस्थांच्यावतीने सत्कार...
सलीम शेख प्रतिनिधी मंगळवेढा.
पंढरपूर:-तालुक्यातील पांडुरंग सहकारी कारखाना लि श्रीपुर च्या चेअरमन पदी मा आ प्रशांत परिचारक यांची बिनविरोध निवड झाल्याने त्यांचे सत्कार सिद्धापूर ग्रामस्थांच्यावतीने माजी जिल्हा परिषद सदस्य बापूराया चौगुले यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
पांडुरंग कारखान्याचे कारभार स्वच्छ आणि पारदर्शक करून देशपातळीवर आज हा कारखाना नावलौकिक मिळविला आहे त्यामुळे सभासद, संचालक मंडळ यांनी पुन्हा एकदा मा आ प्रशांत परिचारक यांच्या दमदार नेतृत्वावर विश्वास ठेवत कारखान्याच्या चेअरमन पदी पुन्हा एकदा संधी दिली आहे.
यावेळी माजी सरपंच नागनाथ कोळी, माजी संचालक दामाजी शुगर जालिंदर व्हनुटगी, वि का सोसायटीचे माजी चेअरमन सुधाकर पाटील, माजी उपसरपंच गंगाधर काकणकी, आप्पासाहेब चौगुले (सर) आदी उपस्थित होते.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा