मंद्रुपमध्येआर.के. फाऊंडेशनच्या वतीने भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन.. - दैनिक शिवस्वराज्य

मंद्रुपमध्येआर.के. फाऊंडेशनच्या वतीने भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन..


*समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनिधी*
सोलापूर (मंद्रूप) : दक्षिण सोलापूर येथील मंद्रुपमध्ये आर.के.फाऊंडेशनच्या वतीने मंद्रुप येथील  विठाई नगर मैदानात दि.15 डिसेंबर 2021 रोजी भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आर.के फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मोतीलाल राठोड यांच्याकडून आर.के.ट्रॉफी विजेत्या संघाला प्रथम बक्षीस 71000 हजार तर द्वितीय बक्षीस 41000 हजार आहे. विशेष करुन या क्रिकेट सामन्यांचे थेट युट्यूब लाईव्ह होणार असल्याची माहिती क्रिकेटर सलीम मोमीन यांनी दिली आहे.मंद्रुपमध्ये युवकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. आणि त्यामध्येच क्रिकेटमध्ये आवड असणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे यासाठी आर.के.फाऊंडेशनच्यावतीने भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे मोतीलाल राठोड यांनी सांगितले. या क्रिकेट सामन्यासाठी अधिक माहिती मिळवण्यासाठी संपर्क - मोबा.  सलीम मोमीन 99705 51070 , मुन्ना शेख 9623412442 या मोबाईल नंबर वर संपर्क करण्याचे आवाहन कमिटी कडून करण्यात आले आहे.

Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads