जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रदीप ढेले यांचे कार्य आदर्शवंत :- राशीद शेख - दैनिक शिवस्वराज्य

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रदीप ढेले यांचे कार्य आदर्शवंत :- राशीद शेख


 
 
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनिधी
सोलापूर :- छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रदीप ढेले यांचे प्रशासकीय कामकाज अतिशय उत्तम सुरू असून जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून गरीब व गरजू रुग्णांना तातडीची वैद्यकीय सेवा देण्यासंदर्भात सुरू केलेले कार्य हे आदर्शवत आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभाग पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस राशीद शेख यांनी केले आहे. 
नुकतेच जिल्हा रुग्णालय सोलापूर येथे प्रदेश काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रदीप ढेले यांचा  सत्कार करण्यात आला यावेळी राशीद शेख बोलत होते. यावेळी अंतिम न्याय चे संपादक शब्बीर मणियार जिल्हा काँग्रेस विभाग सरचिटणीस अकबर शेख हुसेन शेख फिरोज पटेल मशाक मुजावर यासीन शेख शाहिद मुलवाड आदी उपस्थित होते.
आरोग्याशी निगडीत एखादी घटना घडल्यानंतर प्रत्येक व्यक्तीच्या मनाला प्रचंड वेदना होतात अशा दुःखाच्या प्रसंगी प्रत्येकाला आधाराची गरज असते. त्यातच दवाखान्याचा खर्च म्हणजे आजच्या प्रचंड महागाईच्या जमान्यात प्रत्येकालाच खाजगी दवाखान्याची सेवा व खर्च परवडते असे नाही. शहरासह ग्रामीण भागात विस्तारलेल्या जिल्हा रुग्णालयाच्या आस्थापने खाली कार्यरत असणाऱ्या ग्रामीण भागातील जनतेच्या सोयीसाठी ग्रामीण रुग्णालय स्थापन करण्यात आले आहेत या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांना तातडीची व शस्त्रक्रियेची गरज भासल्यास त्या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध असतातच असे नाही परंतु जिल्हा रुग्णालयातील तज्ञ डॉक्टर व कर्मचाऱ्यांची कमतरता असताना काही ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांची तातडीची शस्त्रक्रिया करण्यासाठी स्वतः जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रदीप ढेले यांनी पुढाकार घेऊन गरीब रुग्णांना जीवदान दिल्याचे अनेक उदाहरणे आहेत. नुकतेच मोहोळ येथे एका महिलेच्या पोटाची शस्त्रक्रिया करून जीवदान दिले आहे यामुळे डॉक्टर ढेले यांचे सारखे कर्तव्यदक्ष अधिकारी जिल्हा रुग्णालयात कार्यरत असतील तर रुग्णालयातील सेवा उत्तम मिळण्याबरोबरच  रुग्णालयाचा कायापालट निश्चितच होईल यात शंका नाही. डॉक्टर प्रदीप ढेले यांच्या कार्याचा इतर डॉक्टर अधिकारी यांनीही आदर्श घेऊन या मानवतेच्या कार्यात स्वतःला झोकून द्यावे असेही राशीद शेख यांनी म्हटले आहे.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads