जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण केंद्राकडून विविध कार्यक्रम संपन्न..
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनिधी सोलापूर : जागतिक एड्स दिनानिमित्य दि.01 डिसेंबर 2021 रोजी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण केंद्र, सोलापूर,जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, सोलापूर, श्री. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार काणालय, सोलापूर यांच्या अंतर्गत फैमिली प्लानिंग असोसिएशन इंडिया, सोलापूर शाखा, ए,आर, बुर्ला महिला वरिष्ठ महाविद्यालय, क्रांती महिला संघ, सोलापूर निरामय आरोग्य धाम, औमेन गुप, सोलापूर जिल्हा सामाजिक कार्य समिती, सेवाधाम संस्था, लोकमान्य टिळक नर्सिंग महाविद्यालय सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने येथे व्याख्यान, जनजागृती पोस्टर प्रदर्शन, शुगर व थायरॉइड मोफत तपासणी, PLHIV महिलांना धान्य वाटप, ट्रक ड्रायव्हर आणि मायग्रंट वर्करसाठी HIV तपासणी, कोविड लसीकरण कॅम्प इत्यादी विविध कार्यक्रम पार पाडण्यात आले.
डॉ. शिरीष कुमठेकर यांनी असुरक्षित लैंगिक संबंध, रक्त घटकांचे संक्रमण, दूषित सुया व सिरीजचा वापर, एड्सग्रस्त मातेकडून बाळास या चार मार्गानेच माणसांना एड्स होतो असे मार्गदर्शन केले,
डॉ. अग्रजा चिटणीस (वरिष्ठ वैद्यकीयअधिकारी, ART सेंटर, सोलापूर) यांनी एड्सचा विषाणू माणसाच्या रोग प्रतिबंधक शक्तीवर हल्ला करून ती क्षीण करतो, त्यामुळे क्षयरोग, नागिन, ताप, खोकला यासारखे आजार होतात. पण दक्षता व एक पती, एक पत्नी व्रत पाळल्याने, एड्स सारखा घातक रोग टाळता येतो. एड्स विषयक चाचण्या व औषधे जिल्हा रुग्णालयात मोफत दिली जातात असे सांगितले,
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदिप ढेले, जिल्हा कार्यक्रम अधिकारी भगवान भुसारी यांच्या हस्ते PLHIV महिलांना व CLHIV बालकांना आणि हाय रिस्क ग्रुप महिलांना धान्य वाटप करण्यात आले. डॉ. ढेले यांनी PLHIV महिलांना व हाय रिस्क ग्रुप महिलांना कोविड लसीकरणाचे महत्व सांगून त्यांना कोविड लसीकरण करण्यासाठी प्रोत्याहित केले.
जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणचे सचिव मोकाशी यांनी PLHIV महिलांना व हाय रिस्क ग्रुप महिलांना यांना कायदे विषयक जनजागृती करिता मार्गदर्शन केले.
मार्केट यार्ड येथे HIV तपासणी कॅम्प आयोजित करण्यात आले होते. त्यात हाय रिस्क ग्रुप महिलांनाचे ट्रक ड्रायव्हर आणि मायग्रंट वर्करसाठी HIV तपासणी केली. तसेच PLHIV महिला व हाय रिस्क ग्रुप महिलांचे कोविड लसीकरण शिबीर घेण्यात आले. लोकमान्य टिळक नर्सिंग महाविद्यालय, सोलापूर यांच्या वतीने विद्यार्थ्याने HIV / AIDS या विषयावर पथनाटय सादर करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी डॉ. अग्रजा चिटणीस , कृष्णा सकट, दिनेश राठोड, फैमिली प्लॅनिंग सोलापूर शाखेचे अध्यक्ष प्राचार्य के. एम. जमादार, सचिवा डॉ. आयेशा रंगरेज, बाळकृष्ण बैंडकाळे, गणेश तांदळे, शितल सूर्यवंशी, प्रशात कांबळे, अंबिका धारा, व्यंकटेश आरगे, हर्षवर्धन अहिरे गेनराज दरेकर सर्व NGO चे अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा