मंद्रुप जिल्हा परिषद गट सर्वसाधारण झाल्यास काँग्रेस पक्षाकडून महमद शेख हेच प्रबळ दावेदार - अमीर शेख - दैनिक शिवस्वराज्य

मंद्रुप जिल्हा परिषद गट सर्वसाधारण झाल्यास काँग्रेस पक्षाकडून महमद शेख हेच प्रबळ दावेदार - अमीर शेख






समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनिधी
सोलापूर (मंद्रूप) : अवघ्या काही दिवसातच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे बिगुल वाजणार आहेत. आणि त्या अगोदर आरक्षण सोडत निघणार आहे. या आरक्षण सोडतीत दक्षिण सोलापूर येथील सर्वात चर्चेचा मंद्रुप जि.प.गट सर्वसाधारण झाल्यास काँग्रेस पक्षाकडून मंद्रुपचे निर्भीड पत्रकार व उच्चशिक्षित महमद शेख हेच प्रबळ दावेदार असतील असे मत काँग्रेसचे युवा नेते आमीर शेख यांनी पत्रकारांसमोर व्यक्त केले.
पुढे अमीर शेख म्हणाले कि महमद शेख हे इमानदार तळागाळातील कार्यकर्ते असून जनतेचे कामे करण्यासाठी ते सदैव तत्पर असतात. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही बघत आहोत कि शेख हे सर्वसामान्य व्यक्ती शेतकरी बांधव याच्या समस्या घेवून ते सोडवण्यासाठी प्रयत्न करत असतात. एम.ए.मास कम्युनिकेशन व इतिहास विषयामध्ये एम.ए. उच्च पदवीधर आहेत. आपल्या लेखणीच्या माध्यमातून त्यांनी सतत आवाज उठवले आहेत. अभ्यासू व्यक्तीमत्व व काम करण्याची तळमळ यामुळे मंद्रुप व दक्षिण सोलापूरमध्ये त्यांनी ओळख निर्माण केले आहेत. यावेळी शेख हे जि.प.निवडणूक लढणार असल्याची बातमी सोशल मीडियावर सद्या चर्चेचा विषय बनली आहे.
धर्मनिरपेक्ष विचारांचे व कृतीतून धर्मनिरपेक्षता दाखवणारे शेख यांचा युवकांशी थेट संबंध आहे. व ते जमीनी स्तरावर काम करणारे असल्याने समाजाचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळाच आहे.
मंद्रुप गटातून ते काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवण्यास ईच्छुक आहेत.जर मंद्रुप जि.प.गट सर्वसाधारण झाला तर नक्कीच महमद शेख हे काँग्रेस पक्षाकडून दावेदार होवू शकतात. असे चिन्ह दिसत आहे.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads