भुमि अभिलेखमार्फत भूकरमापक तथा लिपिक पदांच्या १०१३ जागांसाठी भरती
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक संधी आहे. भुमि अभिलेखमार्फत भूकरमापक तथा लिपिक पदांच्या १०१३ जागांसाठी भरती निघाली आहे.Bhumi Abhilekh Recruitment 2021
यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३१ डिसेंबर २०२१ आहे.
या पदांची होणार भरती?
भूकरमापक तथा लिपिक
पात्रता :
०१) मान्यताप्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालयातील किंवा मान्यताप्राप्त संस्थेकडील स्थापत्य अभियांत्रिकी पदविका (Diplomal in Civil Engineering) किंवा माध्यमिक शालान्त परीक्षा उत्तीर्ण केल्यावर मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे दोन वर्षांचे सर्वेक्षक व्यवसायाचे प्रमाणपत्र.
०२) मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखन प्रमाणपत्र.
इतकं मिळेल वेतन :
१९,९००/- रुपये ते ६३,२००/- रुपये.
अर्ज कसा करावा?
पात्र उमेदवारांनी https://mahabhumi.gov.in/Mahabhumilink/ या लिंकवर क्लीक करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची प्रक्रिया ९ डिसेंबरपासून सुरु झाली आहे. तर ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.
भरतीसंदर्भातील जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा