सोलापूर जिल्ह्यातील कोणीही नागरिक किंवा विद्यार्थी युक्रेनमध्ये देशात अडकले असल्यास नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आवाहन.. - दैनिक शिवस्वराज्य

सोलापूर जिल्ह्यातील कोणीही नागरिक किंवा विद्यार्थी युक्रेनमध्ये देशात अडकले असल्यास नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आवाहन..



समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतिनिधी                                      सोलापूर दि.25: सोलापूर जिल्ह्यातील कोणीही नागरिक किंवा विद्यार्थी युक्रेन देशात अडकले असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियंत्रण कक्षाला संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.

सद्यस्थितीत रशिया व युक्रेन या देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. युक्रेन देशात भारतीय नागरिक व विद्यार्थी अडकल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी नवी दिल्ली येथे मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

नवी दिल्ली येथील मदत कक्ष
केंद्रीय परराष्ट्रमंत्री कार्यालय, नवी दिल्ली, टोल फ्री क्र. 1800118797
दूरध्वनी क्र. 011-23012113 / 23014105 / 23017905
फॅक्स 011-23088124 ई मेल situationroom@mea.gov.in

सोलापूर जिल्ह्यातील नागरिक किंवा विद्यार्थ्यांची माहिती देण्यासाठी संपर्क क्रमांक

जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, so दूरध्वनी 0217-2731012
ई मेल rdcsolapur@gmail.com / ddmo.rfsol-mh@gov.in



Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads