जिल्हा परिषद शाळा कुसूर येथे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी सविता रायप्पा आक्कळवाडे यांची तर उपाध्यक्षपदी पल्लवी राजशेखर निकम यांची एकमतानी निवड.. - दैनिक शिवस्वराज्य

जिल्हा परिषद शाळा कुसूर येथे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी सविता रायप्पा आक्कळवाडे यांची तर उपाध्यक्षपदी पल्लवी राजशेखर निकम यांची एकमतानी निवड..



समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतिनिधी 
   सोलापूर (मंद्रूप) :  दि.२२ फेब्रुवारी रोजी दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुसुर येथील जिल्हा परिषद शाळेत शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष पद, उपाध्यक्ष व सदस्य पदाची निवडणूक शांततेत पार पडली.
 जिल्हा परिषद शाळा कुसूर येथे बाळासो बिराजदार यांच्या अध्यक्षतेखाली शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष ,उपाध्यक्ष, सदस्य निवड कार्यक्रम संपन्न झाला.    . 
 शालेय व्यवस्थापन अध्यक्षपदी सविता रायप्पा आक्कळवाडे यांची  व उपाध्यक्षपदी पल्लवी राजशेखर निकम यांची एकमतानी निवड करण्यात आली व यामध्ये अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्यासह सदस्य मंडळी यांची निवड करण्यात आली. व नवनियुक्त सदस्याची व नवयुनिक्त अंगणवाडी सेविका सुषमा ओगसिद्ध कोटे यांचा यथोचित सन्मान व सत्कार करण्यात आला. व या प्रसंगी बोलताना सुनिल नांगरे यांनी आपल्या मनोगतातून नविन शैक्षणीक धोरण(NEP)व ऑनलाईन शिक्षण प्रणाली या बद्ल सविस्तर माहीती सांगितली. 
या कार्यक्रमास  मुख्याध्यापक निलेश नंदरगी सर, भाजपा तालुका कार्यकारणी सदस्य संतोष माशाळे, नकाते सर , बाळासो व्हनमाने , गेनसिद्ध पुजारी, गजानन बिराजदार,माजी सरपंच परशुराम कोळी, तंटामुक्त अध्यक्ष रामगोंडा सावळे,शिवगोंडा हेरकर, चंद्रकांत बिराजदार , परमानंद गुरव, ओगसिद्ध कोटे, दिनकर वाघमारे , सोहम अळ्ळीगिडा , अनिल पुजारी , बाळासो होर्ती , परमेश्वर कोळी , गजानन दसगोंडे आदीच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  शिवानंद माशाळे सर यांनी केले व आभार प्रदर्शन नागनाथ कोळी सर यांनी केले .
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads