वडापूर, वडकबाळ बॕरेजेस साठी जलसंपदामंत्री ना.जयंत पाटील यांचेकडुन हिरवा कंदील - दैनिक शिवस्वराज्य

वडापूर, वडकबाळ बॕरेजेस साठी जलसंपदामंत्री ना.जयंत पाटील यांचेकडुन हिरवा कंदील



सलीम शेख प्रतिनिधी मंगळवेढा
सोलापूर:- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या परिसंवाद यात्रे च्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे जलसंपदामंत्री .जयंत पाटील यांचा दौरा सोलापूर येथे होता.यावेळी "नियोजन भवन,सोलापूर" येथे  नियोजित बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. 
        या बैठकी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जि.सोलापूर चे उपाध्यक्ष प्रा.सुभाषचंद्र  बिराजदार सर व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ता.द.सोलापूर चे मा.तालुकाध्यक्ष सुभाष पाटील यांनी वडापूर येथील बॕरेजेस संदर्भात व सीना नदीवरील बॕरेजेस साठी जलसंपदा विभागाकडुन नाहरकत मिळणेबाबत निवेदनाद्वारे मागणी केली असता जलसंपदामंत्री जयंत  पाटील यांनी याची दखल घेऊन नियोजित बैठकमध्ये जलसंपदा विभाग व अधिकारी वर्गाची मिटींग घेतली. या मिटींगमध्ये वडापुर बॕरेजस साठी मंजुरी मिळाली असुन अर्थसंकल्पात याबाबत तरतुदही केली असल्याचे मंत्रीमहोदयांनी स्पष्ट केले तसेच येत्या वर्षभरात बॕरेजस च्या कामास सुरूवात होईल असे  सांगितले.
  वडकबाळ येथील सीना नदीवरील बॕरेजस चे काम नॕशनल हायवे कडे असुन त्या कामासाठी नॕशनल हायवे ने जलसंपदा विभागाकडे नाहरकत परवानगी मागितली होती तरी या बैठकीमध्ये मंत्री महोदयांनी जलसंपदा विभागास नाहरकत देण्यास सांगितले असुन लवकरच त्याचेदेखिल काम सुरू होईल.या निर्णयामुळे शेतकरी वर्गातुन समाधान व्यक्त करण्यात येत आहे.यावेळी या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जि.सोलापूर चे उपाध्यक्ष प्रा.सुभाषचंद्र  बिराजदार,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ता.द.सोलापूर चे मा.तालुकाध्यक्ष सुभाष  पाटील,नांदणी ता.द.सोलापूर चे सरपंच शिवानंद  बंडे,मद्रे चे सरपंच मुजीब शेख,प्रमोद गुंड,निंगोडा तळ्ळे,गुंजेगाव चे निलेश पाटील आदी उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads