महाराष्ट्र
दक्षिण सोलापूर मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संजीव इंगळेउपाध्यक्षपदी अशोक सोनकंटले तर सचिवपदी आनंदराव बिराजदार यांची बिनविरोध निवड
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतिनिधि
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संजीव इंगळे उपाध्यक्षपदी अशोक सोनकंटले तर सचिवपदी आनंदराव बिराजदार यांची एकमताने निवड करण्यात आली.
१९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीनिमित्त सालाबादाप्रमाणे दक्षिण मराठी पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा संघाचे प्रभारी सचिव शिवदास वाडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार्क चौकातील जिल्हा कार्यालयात पार पडली. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव या पदांसाठी प्रत्येकी एकेक अर्ज आल्याने त्यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
यावेळी पदाधिकारी पुढीलप्रमाणे.
कोषाध्यक्ष :- सुभाष येणेगुरे, प्रसिद्धी प्रमुख :- धोंडप्पा रूपनुरे, सहसचिव :- ईरप्पा बोरीकरजी, सदस्य :- शिवय्या स्वामी , हसन नदाफ, नागेश कोळी, तुकाराम शेंडगे, सल्लागार :- पंचप्पा धनशेट्टी, पंचाक्षरी स्वामी, बिसलसिध्द काळे आदींची निवड करण्यात आली.
या निवडीनंतर नूतन पदाधिकारी यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा हि देण्यात आल्या .सूत्रसंचालन धोंडप्पा रुपनुरे यांनी तर आभार प्रदर्शन हसन नदाफ यांनी केले.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा