गुंजेगाव ता.द.सोलापूर येथे छत्रपति शिवाजी महाराज जयंती निमित्त शिवछत्रपती जयंती उत्सव मंडळाकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन.. - दैनिक शिवस्वराज्य

गुंजेगाव ता.द.सोलापूर येथे छत्रपति शिवाजी महाराज जयंती निमित्त शिवछत्रपती जयंती उत्सव मंडळाकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन..



समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतिनिधी 
  सोलापूर :  महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपूर्ण राज्यासह देशभरात साजरी करण्यात येत आहे. या निमित्ताने राज्यभरात वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यानिमित्ताने गुंजेगाव ता.द. सोलापुर येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. 
                  छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्व पक्षीय पदाधिकारी यांच्या सहकार्याने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुंजेगाव येथे 250 स्कूल बागेचे वाटप करण्यात आले व वृक्षारोपण ही करण्यात आले तसेच लहान मुलांना खाऊ वाटप व अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती. तसेच सायंकाळी भजनी मंडळाचा कार्यक्रम ही करण्यात आला. गुंजेगाव तालुका दक्षिण सोलापूर येथे सर्वधर्मीय यांनी मिळून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले यावेळी उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, महिला, ज्येष्ठ मंडळी, गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads