महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या महासचिवपदी प्रवीणकुमार बिरादार भरघोस मतांनी विजयी - दैनिक शिवस्वराज्य

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या महासचिवपदी प्रवीणकुमार बिरादार भरघोस मतांनी विजयी



सलीम पटेल मोहोळ प्रतिनिधी सोलापूर (मोहोळ): दि.११.०३.२०२२

लातूर ः लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा.सुदर्शनराव बिरादार यांचे चिरंजीव प्रवीणकुमार बिरादार यांनी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रदेश महासचिवपदाची निवडणूक लढविली होती. जाहीर झालेल्या निकालात प्रवीणकुमार बिरादार हे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या महासचिवपदी  भरघोस अशा मताधिक्याने विजयी झाले आहेत. 
 या निवडणुकीत प्रदेश महासिचवपदासाठी प्रविणकुमार बिरादार हे निवडणुक लढवित होते. प्रविणकुमार बिरादार हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे सोशल मिडीयाचे राज्य समन्वयक आहेत. तसेच प्रदेशसचिव म्हणूनही आजपर्यंत ते कार्यरत असुन आज त्यांनी या निवडणुकीत भरघोस मते मिळवुन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस महासचिवपदी विजय मिळविला आहे. 
प्रविणकुमार बिरादार हे इंजिनिअर असुन युपीएससी निमित्त दिल्ली येथे अनेक वर्ष वास्तव्यास होते. त्याठिकाणी काँग्रेस पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांच्या संपर्कात ते आले. तेंव्हापासून ते काँग्रेस पक्षाचे कार्य करू लागले. त्यातच महाराष्ट्र प्रदेश युवक काँगे्रसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सचिवपदी निवड केली. व महाराष्ट्रातील युवकांना काँग्रेस पक्षाशी जोडण्याचे काम प्रविणकुमार बिरादार यांच्यावर सोपविले. मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघात कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण शिबीर घेवून कार्यकर्त्यांना प्रोत्साहीत केले. बिहार विधानसभा निवडणुकीत अनेक युवक कार्यकर्त्यांना घेवून तेथे अनेक मतदारसंघ पिंजुन काढले होते. तेजस्वी यादव यांच्या सभा व त्यांचे नियोजन त्यांनी जवळून पाहिले असुन लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमीत देशमुख, आ.धिरज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अनेक उपक्रम राबविले आहेत. प्रविणकुमार बिरादार यांच्या या विजयाने कार्यकर्ते व समाजबांधवात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या विजयामध्ये काँग्रेस पक्षाचे अनेक मंत्री, आमदार, खासदार, पक्षाच्या विविध पदाधिकार्‍यांचा व लिंगायत समाजातील शेकडो कार्यकर्त्यांचा मोलाचा वाटा आहे. लिंगायत महासंघाचे महाराष्ट्रातील सर्व पदाधिकार्‍यांनी व प्रविणकुमार बिरादार यांच्या मित्र परिवाराने अथक परिश्रम घेवून हा विजयश्री खेचुन आणला आहे. या विजयाबद्दल लिंगायत महासंघाचे जिल्हाध्यक्ष नागनाथप्पा भुरके, जिल्हा संघटक विश्‍वनाथ सताळकर, उपाध्यक्ष काशीनाथ मोरखंडे, तानाजी पाटील, शिवाजी भातमोडे, विजयकुमार कुडूंबले, करीबसवेश्‍वर पाटील, पटणे सर तसेच जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत काला पाटील, शंकरे सर, दिलीप रंडाळे, हल्लप्पा कोकणे, अशोक काडादी, निलकंठ शिवणे, सिद्रामप्पा पोपडे, शहराध्यक्ष बसवराज खंडोमलके, सरचिटणीस लिंगेश्‍वर बिरादार, कोषाध्यक्ष माणिकप्पा मरळे,शिवदास लोहारे रमेश वेरूळे, जयराज बेलुरे, गुरूनाथ हालींगे, तुकाराम कावळे, राधीका कावळे, राजेश्‍वर हुडगे, सुरेश बजगुडे, हेमंत नेलवाडकर, विश्‍वनाथ सावळे स्वामी, विजयकुमार बिडवे, बाळु केजकर, भिमाशंकर ढेकणे, अरविंद पाटील, तानाजी डोके व लातूर जिल्ह्यातील सर्व तालुका व शहर कार्यकारिणीच्या पदाधिकार्‍यांनी व तसेच सोलापूर येथे लिंगायत महासंघाचे प्रदेश सचिव सुरेश वाले जिल्हाध्यक्ष सुरेश शिवपुजे शहर संघटक सिद्धेश्वर वाकळे शहराध्यक्ष सचिन शिवशक्ती उपाध्यक्ष सचिन धुवावे जिल्हा उपाध्यक्ष संतोष राजमाने अक्षय घोंगडे अशोक फसके शिवकुमार शिवपुजे नवनाथ पाटील इत्यादी नी प्रविणकुमार बिरादार यांचे अभिनंदन केले आहे.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads