महाराष्ट्र
पंढरपूर येथे दि.१३ मार्च रोजी प्रा. डॉ.शरण खानापुरे सर यांच्या एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन...
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
सोलापूर (पंढरपूर) : पंढरपूर येथे प्रा. डॉ.शरण खानापुरे सर यांची दिनांक १३ मार्च २०२२ रोजी सकाळी १० ते सायं. ५ वाजेपर्यंत एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमामध्ये खालील मुद्द्यांवर पुराव्यासहित सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
१: इंग्रज काळातील शेकडो पुराव्यावरून असे सिद्ध होते की OTSP मधील प्रत्येक कोळी ऐक तर महादेव कोळी, मल्हार कोळी,
टोकरे कोळी किंवा ढोर कोळी यापैकीच आहेत.
२: सन १९५० पूर्वी कोळी नोंदी कायद्यानेच झाले आहेत आणि कोळी नोंदी असणेच कायद्याने योग्य आहे.
३: मा. सर्वोच्च न्यायालयमध्ये सन १९९४ साली पडताळणी समिती पुणे यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्र वरून, तसेच मा. सर्वोच्च
न्यायालयाचे विविध निकाल, मा.उच्च न्यायालयाचे अनेक निर्णय, तसेच मंत्रिमंडळाचे सन १९९४ मधील ठराव, इत्यादी वरून असेच सिद्ध होते की OTSP मधील कोळी कधीही OBC किंवा SBC मधील नव्हते आणि नाहीत.
४. आदिवासी विकास विभाग, TRTI, आणि पडताळणी समित्या सर्व मिळून OTSP मधील कोळी जमातींच्या विरोधामध्ये
विविध षड्यंत्र रचून प्रत्येकाना संविधानिक आरक्षणापासून कायमस्वरूपी वंचित ठेवले आहेत.
५. कोळी नोंदीवरून अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र हमखासपणे मिळवण्यासाठी कोण-कोणते पुरावे जोडावेत?
६. पडताळणी समित्या जातीचे प्रमाणपत्र जाणीवपूर्वक अवैद्य केल्या कारणाने आज अखेर ज्या कर्मचारी, नोकरदार, अधिकारी,
विद्यार्थी इत्यादींचे नुकसान झाले आहे त्यां सर्वांचे नुकसान भरपाई मिळविण्यासाठी मानवाधिकार आयोग, न्यायालय, तसेच
केंद्रशासनकडे तक्रार/याचिका दाखल करणे बाबत.
या कार्यशाळेस प्रवेश फी - रु. ३००/- आहे.
या कार्यशाळेस सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, आणि पुणे या जिल्ह्यातील समाज बांधव प्रवेश घेवू शकतात.
* सकाळी नाष्टा व चहा आणि जेवण व दुपारी चहा दिला जाईल.
या कार्यक्रमाचे आयोजन समस्त आदिवासी कोळी समाज सोलापूर जिल्हा यांनी केले आहे.
हि कार्यशाळा दिनांक - १३ मार्च २०२२, वेळ- स.१० ते सायं. ५ वा.
स्थळ- श्रीनाथ पॅलेस जुना अकलूज (शिरढोण) रोड पंढरपूर येथे संपन्न होणार आहे.
या कार्यशाळेस सोलापूर व सांगली, कोल्हापूर, सातारा, आणि पुणे या जिल्ह्यातील समाज बांधवांनी सहभाग घ्यावा असे आव्हान आदिवासी कोळी समाज सोलापूर यांनी केले आहे.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा