मंद्रूप ता.द.सोलापूर येथे न्यू गोल्डन स्पोर्ट्स क्लबचा १३ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा.. - दैनिक शिवस्वराज्य

मंद्रूप ता.द.सोलापूर येथे न्यू गोल्डन स्पोर्ट्स क्लबचा १३ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा..


समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतिनिधी 
सोलापूर (मंद्रूप): दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथील गांधी भवन येथे न्यू गोल्डन स्पोर्ट्स क्लबचा १३ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या क्लबने मागील १३ वर्षांपासून अनेक खेळाडूंना घडवले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मंद्रुप अप्पर तहसील कार्यालयाचे तहसीलदार राजशेखर लिंबारे, मंद्रूप पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक डॉक्टर नितीन थेटे, तसेच मंद्रूप ग्रामपंचायतीच्या सरपंचा कालावती खंदारे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते न्यू गोल्डन स्पोर्ट क्लबचे आजी-माजी खेळाडू आणि उच्च पदावर नियुक्त झालेल्या खेळाडूंचा यथोचित सत्कार व सन्मान करण्यात आला.
उपस्थित मान्यवरांसह न्यू गोल्डन क्लबचे संस्थापक अध्यक्ष तथा पत्रकार बबलू शेख यांनी आपले प्रास्ताविकपर मनोगत या वेळी व्यक्त केले. 

              यावेळी न्यू गोल्डन स्पोर्ट्स क्लबच्या पुढील वाटचालीसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी मान्यवरांनी भरभरुन शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास मंद्रूपचे प्रसिध्द उद्योगपती, युवा नेते मळसिद्ध मुगळे, प्राचार्य विश्रांत गायकवाड, मोतीलाल राठोड, अल्लाउद्दीन शेख, श्रीधर टेळे, हाफिज रजा, अप्पाराव कोरे, अलियोद्दीन पाटील, सिद्धाराम मधुरे, रमेश नवले, नितीन रणखांबे, सिद्धाराम काळे, डॉ. शिवानंद झळके, सचिन चोरगी, विश्वनाथ हिरेमठ, सचिन फडतरे, निंगाप्पा कोळी,  गुरुनाथ म्हेत्रे, उमाशंकर रावत, दयानंद ख्याडे, आनंद म्हेत्रे, हर्षवर्धन देशमुख, रेवणसिद्ध मेंडगुदले, प्राचार्य डाॅ. बी. एम. भांजे, गौरीशंकर मेंडगुदले, डॉ. शिवानंद तोरवी, धनंजय म्हेत्रे, ग्रामसेवक नागेश जोडमोटे, प्रा. विजय पवार यांच्यासह खेळाडू आणि ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads