महाराष्ट्र
पत्रकार सेवा संघ विभाग पश्चिम महाराष्ट्राची आढावा बैठक शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे संपन्न...
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
सोलापूर : पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य विभाग पश्चिम महाराष्ट्राची आढावा बैठक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रामनाथ ज-हाड यांच्या अध्यक्षतेखाली रविवार दि. 13 मार्च रोजी शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे संपन्न झाली. या कार्यक्रमास राज्य संपर्कप्रमुख संभाजी साठे, राज्य सचिव अर्जुन अरगडे ,महासचिव ॲड. अविनाश कुलकर्णी, पश्चिम महाराष्ट्राचे सल्लागार नवनाथ गायकवाड, पश्चिम महाराष्ट्राचे राज्यउपाध्यक्ष बाळासाहेब लोखंडे, अहमदनगर जिल्हा अध्यक्ष विकास भडकवाड, संगमनेर तालुका अध्यक्ष मनोज बाभळ ,सोलापूर जिल्हाध्यक्ष विजयकुमार लोंढे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी सोलापूर जिल्हाध्यक्ष विजयकुमार लोंढे यांनी संघटनेच्या पत्रकार सदस्यांच्या प्रमुख मागण्यांचे सविस्तर विवेचन केले. सोलापूर जिल्ह्यात पत्रकार सेवा संघाचे अधिवेशन व पुरस्कार वितरण समारंभ मे महिन्यात घेण्याचे सर्वानुमते ठरले. यानंतर पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या कार्याध्यक्षपदी संभाजी साठे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रामनाथ ज-हाड सर बोलताना म्हणाले की, आज लोकशाहीमध्ये तलवारीऐवजी अन्यायाविरोधात लेखणीचा वापर केला जातो. अन्यायाविरोधात बोलायचे असेल, तर लेखणीच हातात घेऊन आवाज उठवणे महत्त्वाचे आहे. तरच, देशाचा विकास होईल.लेखणी कोणाची दासी होणार नाही असे आवाहन पत्रकारांना केले. व राज्य सचिव अर्जुन अरगडे म्हणाले 36 जिल्ह्यातील विषयपत्रिका एकत्रित करून शासनाकडे या सर्व प्रश्नांचा पाठपुरावा करून पत्रकार महामंडळ स्थापन करण्याचा हेतू स्पष्ट केला .यानंतर ॲड .अविनाश कुलकर्णी म्हणाले, पत्रकारांसाठी स्वतंत्र पतसंस्था स्थापन करण्यात येईल असे सांगितले. नूतन कार्याध्यक्ष संभाजी साठे म्हणाले ,पत्रकारांनी प्रामाणिकपणे काम करा त्यासाठी मी तुमच्या केसालाही धक्का लागू देणार नाही असे म्हणाले. अहमदनगर जिल्हा अध्यक्ष विकास भडकवाड म्हणाले 353 कलममध्ये लवचिकता आणावी. पत्रकार व समस्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत तेव्हा पत्रकारांनी खचून जातात या समस्या परखडपणे मांडाव्यात, आपल्या ओळखपत्राचा गैरवापर होणार नाही याची पत्रकारांनी काळजी घ्यावी असे सांगितले. या आढावा बैठकीत उपस्थित सर्व पत्रकारांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. सुरेखा भालेराव यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला .या बैठकीचे सूत्रसंचालन सोलापूर जिल्ह्याचे उपजिल्हा अध्यक्ष प्रा. संग्राम कांबळे यांनी केले तर सोलापूर शहर संपर्क प्रमुख रवी देवकर यांनी आभार मानले.
या बैठकीत सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष व दक्षिण सोलापूर तालुक्याचे तालुका अध्यक्ष समीर शेख, तालुका उपाध्यक्ष श्रीकांत हाले,खजिनदार मल्लिकार्जुन कांबळे , सचिव : अशोक सोनकंटले, तालुका सहसचिव इलियास शेख कार्यकारणी पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.
तसेच यावेळी मंगळवेढा तालुका अध्यक्षपदी सलिम शेख यांची तर मोहोळ तालुका सचिवपदी सलिम पटेल यांची निवड करण्यात आली. व त्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा