माजी आमदार दिलीपराव माने यांच्या प्रयत्नाला यश ; शेतकऱ्यांच्या कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाईला स्थगिती
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
सोलापूर : थकबाकीमुळे वीज बंद, डीपी बंदची कारवाई महाविरणने केली होती . या कारवाईमुळे आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांसोबत घेऊन माजी आमदार दिलीप माने यांनी महावितरणच्या कार्यालयात तब्बल सहा तास ठिय्या आंदोलन केले होते .
या आदोलनला अखेर यश आले असुुन शासनाकडून या आंदोलनाची दखल घेतली असुुन शेतकऱ्यांच्या वीज पंपांचे कनेक्शन कापण्यास तीन महिन्यांची स्थगिती आणि आधी तोडलेले कनेक्शन पुन्हा जोडून देण्याची घोषणा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी मंगळवारी विधानसभेत केली.
माजी आमदार दिलीपराव माने यांनी दैनिक शिवस्वराज्य न्युज शी बोलताना म्हणाले की , मागच्या तीन-चार महिन्यापुर्वी आंदोलन केलं होते आणि आंदोलन केल्यावर प्रत्येक शेतकऱ्याची लाईन पूर्वपदावर त्यांनी करून दिली आणि परत शेतकऱ्यांची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढले या हेतुने सर्व शेतकऱ्यांचे लाईटचे ट्रांसफार्मर जळाले तर त्यांना द्यायचे नाही, सगळे लाईट बिल भरा म्हणायचे व डेपो वरून सगळ्या लाईन बंद करून टाकायचे. वाड्यावर, वस्त्यावर , गावात शेतकऱ्यांना कुठेही लाईट उपलब्ध नव्हती त्यामुळे मागच्या आठवड्यात दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसोबत आंदोलन केलं त्याच्यामुळे महाराष्ट्र शासनाला आमच्या आंदोलनाची दखल घ्यावी लागली म्हणून पुढील तीन महिन्यासाठी पीक हातात येण्यापर्यंत महाराष्ट्र शासनाने विधानसभेमध्ये शेतकऱ्यांच्या वीज पंपांचे कनेक्शन कापण्यास तीन महिन्यांची स्थगिती देण्यात आली आहे.
यावेळी गुंजेगाव चे उपसरपंच तुकाराम भडकुंबे, सदस्य ज्ञानेश्वर साळुंखे, उत्तम जाधव, किरण आठवले, बाळू काका पाटील, व डी.एम.ग्रूप गुंजेगाव चे प्रमुख विकास पाटील, अमीर शेख, दत्ता पवार ,समाधान जाधव, रामचंद्र गोसावी मेजर मेजर, मोहन पाटील मेजर, समाधान पवार, अविनाश हजारे , कामिल मुजावर, जिलानी मुजावर, नागेश गुंड, कुमार जाधव, सोमनाथ पाटील, समाधान पाटील, मोहन भडकुंबे आदि उपस्थित होते.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा