महाराष्ट्र
हाॅटेल मालकांच्या ११ वर्षीय मुलाचे केले अपहरण ; मोहोळ पोलिसांच्या पथकाने अपहरण केलेल्या मुलाला व संशयित आरोपीला घेतले ताब्यात
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
सोलापूर (मोहोळ) : हॉटेल मालकासोबत झालेल्या पैशाचे देवाण-घेवाण व पाठीमागील भांडणाचा राग मनात धरून हॉटेल मालकाच्या ११ वर्षीय मुलाचे अंकोली येथून आचाऱ्याने अपहरण केल्याची घटना ११ मार्च रोजी घडली होती.
मोहोळ पोलिसांच्या पथकाने मोबाईल लोकेशन च्या आधारे मध्य प्रदेश येथून अपहरण केलेल्या मुलाला व संशयित आरोपी सोनू ओझा याला ताब्यात घेतले.
याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागेंद्र शर्मा, रा. बिहारीपुर, ता. ईटवा, उत्तरप्रदेश यांनी मोहोळ तालुक्यातील अंकोली येथे भाडेतत्त्वावर हॉटेल घेतले असून ते त्या ठिकाणी पत्नी व दोन मुलांसह राहतात. त्यांच्या हॉटेलमध्ये त्यांचेच मावसभाऊ रूपकुमार उर्फ सोनू रामसिंह ओझा रा. मेहदा, जि. भिंड, उत्तरप्रदेश हे आचारी म्हणून कामाला आहे. सोनू ओझा याचे हॉटेल मालक नागेंद्र शर्मा यांच्यात पैशाचे देवाण-घेवाणातुन वाद झाला होता. त्यातुनच सोनू ओझा याने हॉटेल मालक शर्मा यांचा ११ वर्षीय मुलगा अमन याचे ११ मार्च रोजी दुपारी ४ वा. च्या दरम्यान अंकोली येथील हॉटेल जवळून अपहरण केले होते.
याप्रकरणी अमानची आई सुसमादेवी शर्मा यांनी मोहोळ पोलिस ठाण्यात पैशाचा व भांडणाचा राग मनात धरून सोनू याने अमानला पळवून नेल्याची फिर्याद दाखल होती.
पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते , अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ पोलीस हेडकॉन्स्टेबल समाधान पाटील व पोलीस कॉन्स्टेबल गणेश दळवी यांचे पथक मध्यप्रदेश येथे पाठविले. संशयित आरोपी ओझा याच्या मोबाईल लोकेशन वरून पोलीस पथकाने ग्वाल्हेर मध्यप्रदेश येथून अपहरण केलेल्या मुलासह त्याला ताब्यात घेतले. व मोहोळ येथे मुलाला आणून त्याच्या पालकांकडे सुपूर्द करण्यात आले.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा