भाजपच्या पदाधिकार्‍यांनी पाहिला द काश्मिर फाईल चित्रपट - दैनिक शिवस्वराज्य

भाजपच्या पदाधिकार्‍यांनी पाहिला द काश्मिर फाईल चित्रपट



समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
  सोलापूर : विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द काश्मीर फाईल चित्रपट सर्व भारतीयांनी पाहावा असे आवाहन  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत  भाजपचे पदाधिकारी आणि मनिष देशमुख मित्र परिवाराने शहराध्यक्ष विक्रम देशमुख   यांच्यासमवेत 150 कार्यकर्त्यांनी शुक्रवारी एकत्रित चित्रपट पाहिला.
  चित्रपटगृहाच्या बाहेर,सर्व युवकांनी भारत माता की जय, वंदे मातरम, विवेक अग्निहोत्री तुम आगे बढो, नरेंद्र मोदी तुम आगे बढो व देश के गद्दारो को गोली मारो सालो को आदी घोषणा भाजपच्या पदाधिकार्‍यांनी दिल्या. यावेळी मनिष देशमुख म्हणाले की, चित्रपटामध्ये  काश्मिरी पंडितांवर झालेला अत्याचार दाखवला आहे. त्याला वाचा फोडण्याचे काम या चित्रपटातून करण्यात आले आहे. हा चित्रपट सर्व भारतीयांना पाहण्यासारखा आहे.   सर्व भाजपाच्या कार्यकर्त्यांनी हा चित्रपट बघण्याचा संकल्प केला आहे. यावेळी शहराध्यक्ष व्रिकम देशमुख यांनीही हा चित्रपट सर्वांनी पहावा, असे आवाहन केले. यावेळी शहर सरचिटणीस शशी थोरात अक्षय अंजिखाने, सागर आतनुरे, योगेश कबाडे, महेश देवकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads