पत्रकारिता पदवी परिक्षेमध्ये रविना यादव प्रथम - दैनिक शिवस्वराज्य

पत्रकारिता पदवी परिक्षेमध्ये रविना यादव प्रथम

 

सातारा : दादासाहेब जोतीराम गोडसे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाची व एनकुळ गावची सुकन्या रविना आनंदकुमार यादव हिने महा डिजिटल मिडिया असोसिएशन महाराष्ट्र अंतर्गत घेतलेल्या पत्रकारिता परिक्षेमध्ये सर्वोप्रथम येऊन पदवी प्राप्त केली.
    पत्रकारिता या पदवीच्या परिक्षेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून १८७ विद्यार्थी बसले होते. त्यामध्ये एकूण २२ विद्यार्थी गुणवत्ता यादीत. " A" ग्रेड नी उत्तीर्ण झाले.आणि सातारा जिल्ह्यातील रविना यादव ही महा डिजिटल मिडिया असोसिएशन महाराष्ट्र पत्रकारिता परिक्षेमध्ये प्रथम आलेली आहे.तीच्या या यशाबद्दल कॉलेजचे प्राचार्य. डॉ. एस.बी.पाटील, हेडक्लार्क आर.जे.गोडसे,तसेच इंग्रजी विभाग प्रमुख प्रा.कांबळे ,आदी मान्यवरांच्या हस्ते तीला सन्मानपत्र विशेष बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads