महाराष्ट्र
महावितरणच्या वीज वसुली मोहिमेच्या त्रासाला कंटाळून अरळी येथील शेतकरी आत्महत्या करण्याचा प्रयत्न
सलीम शेख प्रतिनिधी मंगळवेढा :-
मंगळवेढा :- तालुक्यातील अरळी येथील शेतकरी आमगोंडा भांजे (तंटामुक्त अध्यक्ष) महावितरणच्या अधिकारी व गावातील झिरो वायरमन यांच्या जाचक वसुली मोहिमेच्या त्रासाला कंटाळून विषारी औषध प्राशन करण्याचा प्रयत्न केला वेळीच इतर शेतकऱ्याने असे करण्यापासून भांजे यांना वाचवले.
गावातील शेतकरी पाच हजार रुपये भरण्यास तयार असताना महावितरणच्या अधिकारी व झिरो कर्मचारी यांच्या जाचक वसुली अटी दहा हजार रुपये भरा अन्यथा वीज जोडली जाणार नाही तसेच झिरो वायरमन गाव पातळीवर राजकारण करून संबंधित शेतकऱ्यांना दमदाटी करत आपल्या जवळच्या लोकांचे वीज जोडणी करून देत आहे. इतर शेतकऱ्याचे वीज पुरवठा खंडित करून आठ दिवस झाले शेतातील पिके जनावरांचा पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात उद्भवल्याने महावितरणच्या मनमानी कारभाराला कंटाळून शेतकरी आमगोंडा भांजे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला.
महावितरण मुळे असे शेतकऱ्यांच्या जीवाचे बरे वाईट होत असेल तर याचे गंभीर परिणाम महावितरणला भोगावे लागतील असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पंढरपूर तालुका अध्यक्ष सचिन शिंदे पाटील यांनी दिले.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा