महाराष्ट्र
काँग्रेस पक्ष संघटनेच्या चळवळीला वाहून घेणारा निस्सीम कार्यकर्ता अकबर शेख यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
सोलापूर :- सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभाग जिल्हा सरचिटणीस अकबर शेख यांचा वाढदिवस जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने साजरा करण्यात आले. त्यांचे अभिनंदन करून भावी कार्यास शुभेच्छा देण्यात. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेस सरचिटणीस भीमराव बाळगे होते. प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभाग पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस तथा जिल्हा उपाध्यक्ष राशिद शेख नागेश बगाळे जिल्हा संघटक रमेश हसापुरे उपाध्यक्ष अल्लाउद्दीन शेख अमीर शेख अप्पू शेख फिरोज पटेल साजिद शेख दत्ता पवार उपसरपंच तुकाराम भडकुंबे यांच्या सह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हा सरचिटणीस भीमराव बाळगे म्हणाले अकबर शेख हे एक उत्तम संघटक असून पक्ष संघटना वाढवण्यासाठी सतत लोकांच्या संपर्कात असतात.
यावेळी बोलताना पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस राशिद शेख म्हणाले की जनतेच्या कोणत्याही अडी अडचणीला धाऊन जाणार शिलेदार असून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब सोलापूर जिल्हाध्यक्ष डॉक्टर दादा मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षसंघटनेत वाहून घेणारा हा एक महत्वाचा कार्यकर्ता असून भविष्यात काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांचा निश्चितच सन्मान होईल . नुकतेच सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस डिजिटल मेंबरशिप अभियानामध्ये दक्षिण सोलापूर मधून वयक्तिक सर्वाधिक जवळपास 700 मतदारांची नोंदणी अकबर भाई शेख यांनी केली आहे. अशा या महत्वकांशी कार्यकर्त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने येणारा काळात त्यांच्या खांद्यावर महत्त्वाची जबाबदारी मिळो हीच सदिच्छा व्यक्त केली. जिल्हा संघटक रमेश हसापुरे भीम संघटनेचे नेते नागेश बंगाळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना त्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन मौलाली शेख यांनी केले.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा