महाराष्ट्र
मंद्रूप येथील संजय नगर येथे शिफा मेडिकल व कदम क्लिनिकचे उद्घाटन संपन्न..
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
सोलापूर (मंद्रूप) : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथील संजय नगर येथे आज बुधवारी कदम क्लिनिक आणि शिफा मेडिकलचे शुभारंभ नगरसेवक तथा रूग्णसेवक बाबा मिस्त्री,माजी कृषी सभापती आप्पाराव कोरे,उद्योजक मळसिद्ध मुगळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी मलकारसिद्ध शेंडगे,हरिओम चौधरी,शफिक बागवान,नितीन टेळे,अफसर मिस्त्री,सुरेश टेळे,सिकंदर आवटे,बबलू मकानदार, ग्रामपंचायत सदस्य सुधाकर कोरे,महादेव कुंभार,सैफअली मुलानी,जयदत्त भोसले,होटगीचे महेबूब शेख यांच्यासह मंद्रूप येथील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.सर्व मान्यवरांचे स्वागत शिफा मेडिकलचे तैय्यब शेख,शहाबुद्दीन शेख,अश्फाक शेख,अल्ताफ शेख,साहिल शेख,सोहेल शेख यांनी केले.शिफा मेडिकलच्या उद्घाटनानंतर सर्व मान्यवरांनी शिफा मेडिकलच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बबलु शेख यांनी केले तर आभार सद्दाम शेख यांनी मानले.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा