४७ किलो चंदनाची तस्करी करणारे २ आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक ; पोलिस उपनिरीक्षक शैलेश खेडकर व त्यांच्या पथकाने केली दमदार कामगिरी.. - दैनिक शिवस्वराज्य

४७ किलो चंदनाची तस्करी करणारे २ आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक ; पोलिस उपनिरीक्षक शैलेश खेडकर व त्यांच्या पथकाने केली दमदार कामगिरी..


समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
सोलापूर ४ एप्रिल : तेजस्वी सातपुते पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी सोलापूर ग्रामीण जिल्हामध्ये होत असलेल्या चंदनाच्या चोरीबाबत कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीणचे सुहास जगताप,पोलीस निरीक्षक यांना आदेशीत केले होते.
         त्यानुसार सुहास जगताप, पोलीस निरीदाक, स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांनी शैलेश खेडकर पोलीस उपनिरीक्षक व त्यांच्या तपास पथकास चंदन चोरी करणारे लोकांवर कारवाई करण्यासाठी नियुक्त केले होते. पो.उप निरीक्षक शैलेश खेडकर हे पथकासह दि. ०३ एप्रिल रोजी सोलापूर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत असताना त्यांना माहिती मिळाली की, दोन इसम मोटार सायकल क्रमांक एम.एच.-१३/क्यू ०३४१ वरून कोंडी गावचे शिवारातून जाणारे सोलापूर ते पुणे रोडने मोहोळकडे जाणार आहेत. त्यावरून त्यांनी सोलापूरकडून येणारे वाहनावर लक्ष ठेवून थांबले. वेळ १६.४५ वा. च्या सुमारास बातमीतील मोटार सायकलवर दोन इसम पांढरे रंगाचे पोते व काळी रंगाची प्रवाशी बॅग घेवून येत असताना दिसले. त्यांचा पथकास संशय आल्याने त्यास थांबण्यास इशारा केला तो न थांबता तसाच वेगाने पुढे जावू लागला. त्यामुळे तपास पथकाने त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले. त्यावेळी त्यांचेकडे असणारे प्लॉस्टीक पोते व बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये ४७ किलो चंदनाचे ओली लाकडे मिळून आले. त्यामुळे त्यांना कायदेशीकर कारवाई करून ताब्यात घेण्यात आलेले आहे. त्यांची घेण्यात आलेल्या झडतीमध्ये ४७ किलो चंदन, झाडे तोडण्याचे साहीत्य, रोख रक्कम, मोटार सायकल व मोबाईल असा ३,६७,२००/- रूपयांचा माल जप्त करण्यात आलेला आहे. सदर मिळून आलेल्या दोन इसमांविरूध्द सोलापूर तालुका पोलीस स्टेशन येथे गुरनं २२५/२०२२, भा.द.वि.क. ३७९,३४ भारतीय वन अधिनियम १९२५ चे कलम ४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्याचा पुढील तपास सपोनि नेताजी बंडगर,सोलापूर तालुका पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
          सदरची कामगिरी ही तेजस्वी सातपुतेपोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, हिंमत जाधव अपर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, सुहास जगताप पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा,सोलापूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली शैलेश खेडकर पोलीस उपनिरीक्षक, नीलकंठ जाधव सहा.पो.उपनिरीक्षक, व प्रकाश कारटकर पोह/९३ व हरीदास पांढरे, पोह/४६०, सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांनी पार पाडली आहे.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads