NEET UG साठी ऑनलाईन नोंदणी सुरू, १७ जुलै रोजी होणार परीक्षा
NTA द्वारे घेतलेल्या या प्रवेश परीक्षेद्वारे, देशभरातील विविध वैद्यकीय संस्थांमध्ये पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतला जातो.नॅ
शनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (NEET) चे वेळापत्रक जाहीर केले आहे.
NEET UG २०२२ साठी अर्ज ६ एप्रिलपासून सुरू झाले आहेत. ६ मे पर्यंत उमेदवार ऑनलाइन फॉर्म भरू शकतील.अर्जाची लिंकही प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवार neet.nta.nic.in या वेबसाइटला भेट देऊन फॉर्म भरू शकतात. १७ जुलै रोजी परीक्षा होणार आहे.
२०० बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील
NTA द्वारे घेतलेल्या या प्रवेश परीक्षेद्वारे, देशभरातील विविध वैद्यकीय संस्थांमध्ये पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतला जातो. या परीक्षेत विद्यार्थ्यांकडून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र (वनस्पतिशास्त्र आणि प्राणीशास्त्र) २०० बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील. प्रत्येक विषयातील ५० प्रश्न दोन विभागांमध्ये (अ आणि ब) विभागले जातील.
५५७ शहरांमध्ये होणार आहे
अधिकृत सूचनेनुसार, NTA NEET UG १७ जुलै २०२२ रोजी दुपारी २:०० ते ५:२० या वेळेत घेण्यात येईल. विद्यार्थ्यांना प्रश्न सोडवण्यासाठी २०० मिनिटे म्हणजे ३ तास २० मिनिटे दिली जातील. ही परीक्षा भारतातील ५४३ आणि परदेशातील १४ शहरांमध्ये होणार आहे.
१३ भाषांमध्ये परीक्षा
NEET UP 2022 देशातील १३ भाषांमध्ये आयोजित केले जाईल. यात इंग्रजी, हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिया, पंजाबी, तमिळ, तेलगू आणि उर्दू या भाषांचा समावेश आहे.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा