राज्यसेवा २०२२ साठी १६१ पदे, २१ ऑगस्टला परीक्षा - दैनिक शिवस्वराज्य

राज्यसेवा २०२२ साठी १६१ पदे, २१ ऑगस्टला परीक्षा

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) १६१ पदांसाठी राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२२ घेतली जाणार आहे. २१ ऑगस्टला राज्यभरातील ३७ केंद्रांवर परीक्षा होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

एमपीएससीने राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२२ साठीची जाहिरात बुधवारी प्रसिद्ध केली. त्यानुसार वित्त आणि लेखा सेवा गट अ सहायक संचालक, नगरपालिका, नगरपरिषद मुख्याधिकारी गट अ, बालविकास प्रकल्प अधिकारी गट अ, राज्य उत्पादन शुल्क सहायक आयुक्त गट ब, राज्य उत्पादन शुल्क आयुक्त गट ब, कक्ष अधिकारी गट ब, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट ब आदी पदांसाठी प्रक्रिया राबवण्यात येईल. पूर्व परीक्षेतील निकालाच्या आधारे २१ ते २३ जानेवारी किंवा त्यानंतर मुख्य परीक्षा होण्याची शक्यता आहे. या पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्यासह आरक्षण, पात्रता, भरती प्रक्रियेतून बाहेर पडणे या संदर्भातील सूचनाही देण्यात आल्या आहेत. पदसंख्या आणि आरक्षणामध्ये राज्य शासनाच्या विभागांच्या सूचनेनुसार बदल होण्याची शक्यता आहे. नमूद केलेल्या संवर्गाव्यतिरिक्त नवीन संवर्गातील पदांचा नंतरच्या टप्प्यावर समावेश होण्याची शक्यता आहे. त्यानुसार पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत संबंधित विभागाकडून सुधारित, अतिरिक्त किंवा नवीन संवर्गाच्या मागणीपत्रानुसार उपलब्ध होणारी पदे पूर्व परीक्षेच्या निकालासाठी विचारात घेतली जातील, असे नमूद करण्यात आले आहे.

पूर्व परीक्षेतील निकालाच्या आधारे २१ ते २३ जानेवारी किंवा त्यानंतर मुख्य परीक्षा होण्याची शक्यता आहे. या पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्यासह आरक्षण, पात्रता, भरती प्रक्रियेतून बाहेर पडणे या संदर्भातील सूचनाही देण्यात आल्या आहेत.

Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads