महाराष्ट्र
'सायन्स पार्क'चे मा. आदित्य ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न
परभणी प्रतिनिधी शिवाजी सावणे :-
आपल्या अथक प्रयत्नांनंतर महाविकासआघाडी सरकारच्या व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या अद्ययावत 'सायन्स पार्क'चे भूमिपूजन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. पालकमंत्री ना. धनंजय मुंडे , उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदयजी सामंत , खा. हेमंत पाटील, खा. संजय जाधव, कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, अपर जिल्हाधिकारी राजेश काटकर व मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.
"ग्रामीण भागातही अनेक गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये शास्त्रज्ञ दडलेले आहेत. त्याचा कोणी शोध घेत नाही. हे काम आमदार राहुल पाटील यांनी सायन्स पार्कच्या माध्यमातून केले आहे. देशात प्रथमच अशा प्रकारचे सायन्स पार्क परभणी येथे उभारले जाईल. त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही," अशी ग्वाही ना. आदित्य ठाकरे यांनी याप्रसंगी बोलताना दिली.
"आपणा सर्वांसाठी हा एक ऐतिहासिक दिवस आहे. महाविकास आघाडी सरकार, ना. आदित्य ठाकरे व या सायन्स पार्कच्या मंजुरीसाठी सहकार्य केलेल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. यापुढे परभणी जिल्ह्यातून आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वैज्ञानिक नक्की तयार होतील. विज्ञानाच्या विद्यार्थ्यांना या माध्यमातून भव्य व्यासपीठ आपण तयार करून दिले आहे. सायन्स पार्क मधील प्रात्यक्षिक निरीक्षणे त्यांना नक्कीच वैज्ञानिक कोडी उलगडण्यास मदत करतील..
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा