शालार्थ आयडीचा प्रलंबित प्रस्ताव तात्काळ शिक्षण उपसंचालक यांचेकडे पाठवावा अन्यथा आमरण उपोषणास बसणार ; अनिता राठोड - दैनिक शिवस्वराज्य

शालार्थ आयडीचा प्रलंबित प्रस्ताव तात्काळ शिक्षण उपसंचालक यांचेकडे पाठवावा अन्यथा आमरण उपोषणास बसणार ; अनिता राठोड


समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
सोलापूर ( भंडारकवठे) : अनिता मानसिंग राठोड उपशिक्षिका महासिध्द प्राथमिक शाळा भंडारकवठे, ता. द. सोलापूर, जि. सोलापूर येथे कार्यरत असून त्यांना मान्यता जा. क्र. मिळालेली आहे. 
        परंतु कोणतेही वेतन व भत्ते चालू नाहीत कारण शालार्थ आयडी नंबर नाही. शालार्थ आयडी मिळावा म्हणून प्रस्तावावर मुख्याध्यापक यांनी सही करून पाठवावा म्हणून पत्रान्वये कळविले आहे. सदरच्या प्रस्तावावर मुख्याध्यापकांना आदेश असतानाही सही करून शालार्थ आयडी या प्रस्तावावर वेतन अधिक्षक (प्राथमिक) सोलापूर यांचेकडे पाठवत नाहीत. त्यामुळे वेतनापासून वंचित आहे. सदरचा प्रस्ताव मुख्याध्यापक सहीविना वेतन अधिक्षक (प्राथमिक) यांचेकडे सादर केलेला आहे. गेली दोन महिन्यांपासून शालार्थ आयडीचा प्रस्ताव प्रलंबित आहे. सदरचा शालार्थ आयडीचा प्रलंबित प्रस्ताव तात्काळ शिक्षण उपसंचालक पुणे विभाग पुणे यांचेकडे पाठवावा अन्यथा मंगळवार दिनांक १७/०५/२०२२ पासून संविधानिक मार्गाने आमरण उपोषणास बसणार असल्याचे अनिता राठोड यांनी पत्राद्वारे कळविले आहे.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads