मुंबईत सोलापूर जिल्हा आर्टिस्ट अभिनव सहकारी संस्थेच्या कला प्रदर्शनाचे उदघाटन... - दैनिक शिवस्वराज्य

मुंबईत सोलापूर जिल्हा आर्टिस्ट अभिनव सहकारी संस्थेच्या कला प्रदर्शनाचे उदघाटन...


समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
सोलापूर : सोलापूर जिल्हा आर्टिस्ट अभिनव सहकारी संस्थेच्या कला प्रदर्शनाचे जहांगीर आर्ट गॅलरी, मुंबई येथे आयोजन करण्यात आले असून या कला प्रदर्शनाचे उद्घाटन अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सहकार मंत्री तथा सोलापूर सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष सुभाष देशमुख, प्रमुख पाहुणे ललित कला अकादमी प्रोटेमचे चेअरमन श्री.उत्तम पाचर्णे, माजी पोलिस अधिकारी अमर जाधव, उद्योजक अजित कंडरे, आर्टिस्ट सहकारी संस्थेचे चेअरमन विठ्ठल मोरे सचिव नरेंद्र काटीकर व इतर सहभागी कलाकार आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रदर्शनामध्ये सोलापुरातील 18 कलाकार -चित्रकार, शिल्पकार आपली कला सादर केली आहे. हे प्रदर्शन दिनांक 3 मे ते 9 मे 2022 या कालावधीमध्ये सकाळी 11 ते सायं. 5 वाजेपर्यंत रसिकांसाठी उपलब्ध राहणार आहेत.
तरी या प्रदर्शनाला नागरिकांनी भेट द्यावी असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads