अंत्रोळी ता.द.सोलापूर येथे रमजान ईद उत्साहात साजरी.. - दैनिक शिवस्वराज्य

अंत्रोळी ता.द.सोलापूर येथे रमजान ईद उत्साहात साजरी..



समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
सोलापूर : मुस्लिम समाजाचा वर्षभरातील सर्वात मोठा उत्सव असलेल्या रमजान ईद अंत्रोळी ता.द.सोलापूर येथे उत्साहात साजरी
करण्यात आली. 

 पवित्र अशा रमजान महिन्यातील रोजे म्हणजेच उपवास संपल्यानंतर आणि मागील दोन वर्ष कोरोना काळातील निर्बंधांनंतर आज अंत्रोळी येथे नमाज अदा करण्यासाठी सर्व मुस्लिम बांधव ईदगाह मैदानावर (दरगाह) मध्ये एकत्र आले होते. ईदगाह मैदानावर दरगाहया मध्ये एकत्र येत सामुदायिक नमाज पठण केले.

 दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी येथे सर्व मुस्लिम बांधवानी हिंदू व मुस्लिम बांधवांना सणानिमित्त शुभेच्छा दिल्या. तसेच हिंदू व मुस्लिम बांधवांमधील एकता व अखंडता टिकून रहावी यासाठी प्रार्थना केली. नमाज पठण झाल्यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईद मुबारक म्हणत गळेभेट घेत रमजान ईदच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत. यामध्ये चिमुकल्यांचा देखील सहभाग असल्याचे दिसून आले आहे.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads