आजचे राशिभविष्य १८-०५-२०२२ - दैनिक शिवस्वराज्य

आजचे राशिभविष्य १८-०५-२०२२

आजचे राशिभविष्य १८-०५-२०२२

मेष :-

नवीन कामाला सुरुवाता करण्याचा गणेशजींचा सल्ला आहे. गूढ विद्या तसेच रहस्यमय विषय समजून घेण्याचा आज प्रयत्न करा. उक्ती आणि कृतीवर संयम ठेवा, तेच आपल्या फायदयाचे आहे. दुपारनंतर नवीन कार्यारंभ करू शकता. प्रकृतीकडे लक्ष द्या. धंदा व्यवसायात जरा संभाळूनच. सहकार्यांचे सहकार्य मिळेल. अपत्यांबाबत द्विधा मनस्थिति राहील.

वृषभ :-

दिवसाची सुरुवात आनंदाने व मित्रभेटीने होईल. नवीन माणसे भेटतील. सहलींचे आयोजन होऊ शकंते. परंतु दुपारनंतर सावध राहण्याचा सल्ला गणेशजी देतात. भाषेचा दुरुपयोग करू नका नाहीतर वादविवाद होतील. हितशत्रूपासून सावधान. प्रकृतीकडे लक्ष द्या. अध्यात्मिक विषयात गोडी वाढेल.

मिथुन :-

गणेशजी सांगतात की आपला आजचा दिवस मनोरंजनातून आनंद घेण्याचा आहे. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. कार्यालयात सहकार्याचे वातावरण असेल. मित्रांसोबत सहलीला जाल. चविष्ठ भोजनाचा आनंद मिळेल.

कर्क :-

प्रतिकूलतेतून कष्टाने काम कराल तर पुढे रहाल. पोटाच्या तक्रारी निर्माण होतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. परंतु दुपारनंतर परिस्थिती अनुकूल बनेल. स्वास्थ्य सुधारेल. मानसिक स्वास्थ्यही ठीक राहील. नोकरीमध्ये सहकार्यपूर्ण वातावरण राहील. अपुरी कामे पर्णत्वास जातील. शत्रूवर विजय मिळवाल.

सिंह :-

आज सांभाळून चालण्याचा दिवस असल्याचे श्रीगणेश सांगतात. मानसिक स्थिती तणावपूर्ण राहील व शारीरिकदृष्टया अस्वस्थता जाणवेल. कुटुंबियांशी एखादा खटका उडू शकतो म्हणून संयम ठेवण्याचा सल्ला गणेशजी देतात. धन व कीर्ती यांची हानी संभवते मुलांबद्दल चिंतित रहाल. बौद्धिक वादापासून दूर रहा. आर्थिक नियोजनासाठी अनुकूल काळ.

कन्या :-

आपल्याला भाग्यवृद्धि आणि लाभाचा योग असल्याचे गणेशजी सांगतात. आप्तांकडून फायदा. आपसातील संबंधात प्रेम आणि सन्मानाचे वातावरण असेल. परंतु दुपारनंतर चिंतीत रहाल त्याचा शरीर व मनाच्या स्वास्थ्य वर परिणाम होऊ शकतो. आप्तांच्या बाबतीत काही दुःखद प्रसंग घडू शकतो. आईची तब्येत बिघडण्याची शक्यता जास्त आहे. जलाशयापासून दूर रहा.

तूळ :-

शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडू शकते. कौटुंबिक वादात बोलण्यावर संयम ठेवा. नकारात्मक मानसिकता सोडून द्या. घरच्या सदस्याना चिंता होणार नाही याकडे लक्ष द्या. दुपारनंतर मनातील खेद दूर होऊन आनंदाचा प्रकाश निर्माण होईल. नवीन कामाच्या सुरुवातीसाठी आपण तयार व्हाल. प्रतिस्पर्ध्यांवर विजय प्राप्त होईल. प्रवासाचे योग आहेत.

वृश्चिक :-

आजचा आपला मध्यम दिवस आहे. सुख व समाधान अनुभवाल. कुटुंबियासमवेत आनंदात वेळ घालवाल. शुभ समाचार येतील. दुपारनंतर कुटुंबात वाद होऊ शकतात म्हणून गैरसमज दूर करा. अनावश्यक खर्चावर ताबा ठेवा शारीरिक स्वास्थ्य बिघडेल. विद्यार्च्यांना अभ्यासात अडचणी.

धनु :-

आजचा दिवस दुर्घटना तसेच शल्यचिकित्सा यापासून सांभाळून रहा असा श्रीगणेश सल्ला देत आहेत. आनंद व सुख यासाठी अधिक खर्च होईल. स्वभाव तापत बनेल. संबंधितांशी मनाविरुद्ध घटना घडतील. दुपारनंतर शारीरिक व मानसिक प्रसन्नता प्राप्त करू शकता. मित्राकडून व आप्तांकडून भेटवस्तू मिळाल्याने दिवस आनंदात जाईल. कुटुंबातील वातावरण प्रसन्न राहील.

मकर :-

आजचा दिवस व्यापार धंद्यासाठी लाभदायक आहे असे गणेशजी सांगतात. पत्नी आणि पुत्र यांच्याकडून फायदा होईल. पारिवारिक जीवनात घडणारे सुखदायी प्रसंगामुळे मन आनन्दी राहील. दुपारनंतर मनाची अशान्ती व शारीरिक अस्वस्थता राहील. दुसर्याशी बोलताना गैरसमज होणार नाहीत यांची काळजी घ्या. आनंद व मनोरंजनासाठी खर्च होईल तरीही अपमान होण्याचीही पूर्ण शक्यता आहे.

कुंभ :-

आजचा दिवस लाभदायक आहे असे गणेशजी सांगतात. व्यवसाय धंदयात प्राप्ती होईल. मानसम्मान होईल. नोकरी व्यवसायात पदोन्नती. वरिष्ठ आपल्यावर प्रसन्न राहतील. स्वास्थ्य ठीक राहील. येणे वसूल होईल. मित्र भेटतील. रमणीय स्थळाला भेट द्याल. संततीच्या प्रगतीने आपण सुखावून जाल. कौटुंबिक जीवनात आनंद राहील.

मिन :-

बौद्धिक विषयात व त्या संबंधी लेखनात आज आपण मग्न रहाल. नवीन कार्याची सुरुवात करू शकता. दूरचे प्रवास व तीर्थयात्रा यांचे योग आहे, मोठया प्रतिष्ठानला भेट द्याल. परदेशातील मित्र स्वकियांशी सुसंवाद साधाल. उत्साह आणि थकवा दोन्हीचाही अनुभव घ्याल. कार्य विघ्नाशिवाय पूर्ण होईल. धनलाभ संभवतो.

Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads