आजचे राशिभविष्य १७-०५-२०२२ - दैनिक शिवस्वराज्य

आजचे राशिभविष्य १७-०५-२०२२

आजचे राशिभविष्य १७-०५-२०२२

मेष :-

श्रीगणेश सांगतात की आज आपण सांसारिक गोष्टी बाजूला ठेवून अध्यात्माकडे वळाल. गूढ रहस्यमय विद्ये कडे आकर्षण राहील. गाढ चिंतन- मनन आपणाला अलौकिक अनुभूती देईल. वाणीवर संयम ठेवाल तर अनेक गैरसमजातून वाचाल. अचानक धन लाभ होईल. हितशत्रूपासून जपून राहा. नवीन कार्यारंभ करू नका. स्त्री आणि पाण्यापासून जपून राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात.

वृषभ :-

श्रीगणेशाच्या आशीर्वादाने संसारात आणि दांपत्य जीवनात सुख- शांती अनुभवाल. परिवारातील सदस्य आणि निकटचे मित्र यांच्या समवेत उत्तम भोजनाचा आस्वाद घ्याल. एखाद्या जवळपासच्या प्रवासाचे नियोजन कराल. तब्बेत चांगली राहील. धनलाभ होईल. दूर राहणार्‍या स्नेह्यांकडून येणारी वार्ता खुश करील. भागीदारीत लाभ आणि सार्वजनिक जीवनात मान- सन्मान मिळतील.

मिथुन :-

श्रीगणेश कृपेने आज आपली अपूर्ण कामे पूर्ण होतील. त्यात मनासारखे यश मिळेल. घरातील शांती व समाधानाचे वातावरण मनाला प्रसन्न ठेवेल. तब्बेत चांगली राहील. आर्थिक लाभ होईल. ऑफिस मध्ये संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील. सावधानता बाळगा.

कर्क :-

दिवसाची सुरूवात चिंता आणि उद्वेगाने होईल. तब्बेतीच्या तक्रारी पण राहतील. नवे काम सुरू करण्यासाठी दिवस चांगला नाही. अचानक धन खर्च होईल. प्रेमिकां मध्ये वादविवाद होऊन मतभेद किंवा बोलाचाली होईल. कामुकते मुळे मानभंग होणार नाही याची काळजी घ्या. यात्रा- प्रवासात अडचणी येतील असे श्रीगणेश सांगतात.

सिंह :-

नकारात्मक विचार निराशा निर्माण करतील. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. घरात विसंवादाचे वातावरण राहील. आईवडिलांशी मतभेद होतील. त्यांची तब्बेत बिघडेल. जमीन, घर, वाहन खरेदी विषयक कागद पत्रांसंबंधी सावध राहा. जलाशयापासून जपा. भावनेच्या भरात वाहवत जाऊ नका असे श्रीगणेश सांगतात.

कन्या :-

अविचाराने कोणतेही काम करण्यापासून स्वतःला जपा असे श्रीगणेश सांगतात. कामात यश तर मिळणारच आहे. प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल. भावंडे आणि शेजारी यांच्याशी चांगले संबंध राहतील. आर्थिक लाभ होतील. प्रेयसीचा सहवास लाभेल. समाजात मान- सन्मान मिळेल. चित्तवृत्ती प्रफुल्लित राहतील.

तूळ :-

आपला हट्टीपणा सोडून समाधानकारक काम करण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. आपली असंयमित वाणी कोणाशी मतभेद निर्माण करेल. द्विधा स्थितीत अडकलेले मन कोणताही ठोस निर्णय घेऊ देणार नाही. महत्त्वाचा निर्णय आज न घेण्याची सूचना श्रीगणेश देतात. तब्बेतीकडे लक्ष द्या.

वृश्चिक :-

तन- मनाने खुश आणि ताजेतवाने राहाल. कुटुंबीय आणि मित्रांसह उत्तम भोजन, प्रवास, भेट- मुलाखात होईल. जीवन साथीदारा बरोबर गाढ आपलेपणा निर्माण होईल. आर्थिक लाभ होईल. शुभ कार्यानिमित्त बाहेर जावे लागेल. आनंददायक वार्ता मिळतील. श्रीगणेशाचे आशीर्वाद आपणा सोबत आहेत.

धनु :-

श्रीगणेशांच्या मते आजचा दिवस आपणासाठी कष्टदायक राहील. तब्बेत बिघडेल. परिवारातील व्यक्तींसोबत कटकट झाल्याने मन दुःखी होईल. त्यांमुळे मानसिक दृष्ट्या पण अस्वस्थ राहाल. रागावर जरा अंकुश ठेवा. दुर्घटनेपासून जपा. कोर्ट- कचेरीतील प्रकरणांपासून सावध राहा. अधिक खर्च झाल्याने पैशाची चणचण भासेल.

मकर :-

नोकरी- व्यवसाय तथा समाजातील अन्य क्षेत्रांत आजचा दिवस आपणाला शुभ जाईल असे श्रीगणेश सांगतात. मित्र आणि आप्तेष्टांसह बाहर जाल. मंगल कार्यात हजेरी लावाल. मैत्रिणी, पत्नी आणि मुलगा यांच्याकडून लाभ होईल. विवाहोत्सुक युवक- युवतींची वैवाहिक समस्या सुटेल. प्रवास पर्यटन होईल.

कुंभ :-

श्रीगणेश कृपेने आपले प्रत्येक काम निर्विघ्नपणे पूर्ण होईल. त्यामुळे आपण खुश राहाल. नोकरी- व्यवसायात परिस्थिती अनुकूल राहील व कार्यात यश मिळेल. वडीलधारे आणि वरिष्ठ अधिकारी यांची कृपादृष्टी असल्याने कोणत्याही प्रकारच्या मानसिक दडपणातून मुक्त व्हाल. संसारात आनंद वाटेल. धनप्राप्ती तसेच बढतीचे योग आहेत.

मिन :-

नकारात्मक विचार वरचढ होणार नाहीत यासाठी प्रयत्नशील राहण्याची सूचना श्रीगणेश देतात. मानसिक अस्वास्थ्य सतावेल. तब्बेतीची तक्रार राहील. नोकरीत वरिष्ठांशी काम करताना सावध राहा. संततीच्या समस्या सतावतील. प्रतिस्पर्ध्यांची चाल यशस्वी होईल. आज कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका असा सल्ला श्रीगणेश देत आहेत.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads