बँक ऑफ इंडियाच्या ६९६ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू, जाणून घ्‍या संपूर्ण प्रक्रिया - दैनिक शिवस्वराज्य

बँक ऑफ इंडियाच्या ६९६ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू, जाणून घ्‍या संपूर्ण प्रक्रिया

वेगवेगळ्या बँकांमध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तींसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आले आहे. बँक ऑफ इंडियाने आयटी व्यवस्थापकासोबत इतर पदांच्या भरतीसाठी आपली जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
या पदासाठी अर्ज भरण्यास २६ एप्रिल २०२२ पासून सुरूवात झाली आहे.

इच्छुक उमेदवार bankofindia.co.in या संकेतस्थळामार्फत अर्ज भरू शकतात. अर्ज भरण्यासाठी शेवटची तारीख १० मे २०२२ अशी आहे. समोर आलेल्या माहितीनुसार ही भरती, नियमित आणि कंत्राटी पद्धतीने केली जात आहे. पात्र उमेदवारांना बँकेत काम करण्याची संधी मिळू शकते.

सध्या बँक ऑफ इंडियाच्या शाखांमध्ये एकूण ६९६ रिक्त पदे आहेत. यातील आता ५९४ पदे नियमितपणे तर १०२ पदे कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहेत. त्यामुळे बँकेत काम करण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तींसाठी ही सुवर्णसंधी मानली जात आहे.

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. अर्ज भरण्यासाठी OBC उमेदवाराकडून ८०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. तरी SC उमेदवाराकडून १७५ रुपये आकारले जाणार आहे. या पदासाठीची परीक्षा प्रक्रिया लेखी परीक्षा, गट चर्चा आणि मुलाखत अशा पद्धतीने असणार आहे.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads