नोकरीविषयक
NHM अंतर्गत नाशिकमध्ये विविध पदांची भरती ; वेतन 20,000 मिळेल
राष्ट्रीय आरोग्य अभियान, नाशिक (National Health Mission Nashik) मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचनाजारी करण्यात आली असून यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मे 2022 असणार आहे.
एकूण जागा :
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) कार्यक्रम समन्वयक (Programme Co-Ordinator)
शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MSW or MA in Social Science पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
२) लसीकरण फील्ड मॉनिटर (Immunization Field Monitor)
शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Typing skill, Marathi - 30 WPM , English 40 WPM with MSCIT पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
३) स्टाफ नर्स (Staff Nurse)
शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी GNM/ Bsc Nursing पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगार
कार्यक्रम समन्वयक (Programme Co-Ordinator) – 20,000/- रुपये प्रतिमहिना
लसीकरण फील्ड मॉनिटर (Immunization Field Monitor) – 20,000/- रुपये प्रतिमहिना
स्टाफ नर्स (Staff Nurse) – 20,000/- रुपये प्रतिमहिना
अर्ज करण्यासाठीचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा प्रशिक्षण पथक समोर, जिल्हा रुग्णालय आवार, नाशिक.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा