सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सक्षम बनवा :- आ.सुभाष देशमुख - दैनिक शिवस्वराज्य

सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सक्षम बनवा :- आ.सुभाष देशमुख


समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतिनिधी 
 सोलापूर ( भंडारकवठे ) : भंडारकवठे सोसायटीतील ऐतिहासिक विजयाबद्दल आमदार देशमुख यांच्या हस्ते नुतन संचालकांचा सत्कार.
                सोसायटीच्या माध्यमातून सर्व सामान्य शेतकऱ्यांना आर्थिक बाजुने सक्षम बनवा असे प्रतिपादन आमदार सुभाष देशमुख यांनी केले.ते आज भंडारकवठे.ता.द सोलापूर येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीत ऐतिहासिक विजय संपादन केलेल्या नुतन संचालकांच्या सत्कार कार्यक्रमांत बोलत होते. यावेळेस सरचिटणीस यतीन शहा, प्रा.व्हि.के.पाटील सर,शिवानंद भरले सर,यांनीही आपले विचार मांडले
               आमदार सुभाष देशमुख पुढे बोलतांना म्हणाले की,विकास सोसायटीद्वारे जिल्ह्यांमध्ये केवळ कर्ज देणे घेणे यासाठी काम न करता संस्थेमार्फत विविध व्यवसाय वाढीस प्राधान्य द्यावे.आणि नुतन संचालकांनी दौंड तालुक्यातील काष्ठी गावास भेट देऊन संस्थेचा कारभार आदर्शवत करावा.असे आवाहन केले.
                यावेळेस भाजपाचे तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, जेष्ठ नेते हणमंत कुलकर्णी सर,जेष्ठ नेते प्रा.व्हि.के.पाटील सर,भाजपाचे तालुका सरचिटणीस यतीन शहा,रामसिंग रजपूत,गंगाधर कोरे सर, अशोक मुक्काणे, संचालक भीमाशंकर बबलेश्वर, संचालक गोपाल जंगलगी,महादेव कोरे,सिध्दण्णा बगले,सोमनिंग कमळे,सोमनिंग विरदे,मुन्नाभाई शेख,बसवराज मुक्काणे,धरेप्पा तेली,यांच्यासह सर्व नुतन संचालक तसेच पिर महासिध्द शेतकरी विकास पॅनलचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads