महाराष्ट्र
वडापूर ता.द.सोलापूर येथे छत्रपती क्रिकेट क्लब वडापूर आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन संपन्न...
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
सोलापूर (मंद्रूप) : वडापूर ता.द.सोलापूर येथे छत्रपती क्रिकेट क्लब वडापूर आयोजित छत्रपती चषक -२०२२ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन संपन्न झाले.
या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे पहिले तीन बक्षिस पुढील प्रमाणे
* प्रथम पारितोषिक Rs. 15,001/रुपये
* द्वितीय पारितोषिक Rs. 10,00/रूपये
* तृतिय पारितोषिक Rs.7,000/ रुपये व इतर
बक्षिसे क्रिकेटर क्लब व ग्रामस्थ, क्रिकेट प्रेमी कडुन देण्यात येणार आहेत. तरी पंचक्रोशीतील क्रिकेट संघानी या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आव्हान छत्रपती क्रिकेट क्लब, वडापूर यांनी केले आहे.
या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटना प्रसंगी कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शंभूराजे यांच्या प्रतिमेचे पूजन गणपती महादेव पुजारी यांच्या हस्ते करण्यात आले.
मैदानाचे पूजन सुहास पाटील सर यांच्या हस्ते करण्यात आले.
या उद्घाटनास प्रमुख पाहुणे म्हणून अरुण पाटील सर , सुहास पाटील, अॅड. संतोष पाटील, सुनील पाटील, दिनेश कदम, प्रवीण पाटील, अहमत तांबोळी, सचिन पाटील, सुरज चटके, तसेच पंचक्रोशीतील क्रिकेट प्रेमी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा