ऊंबर्डे येथील खोत वस्तीमधील रस्ता चालू करा - दैनिक शिवस्वराज्य

ऊंबर्डे येथील खोत वस्तीमधील रस्ता चालू करा


सातारा प्रतिनिधी -रविना यादव.

         खटाव तालुक्यातील उंबर्डे येथील हनुमान वार्ड क्रमांक एक मधून जाणारा खोतवस्तीतील वडूज - गोपूज रोड, सुरेश पवार ( बापू ) यांच्या घरापासून ते गावापर्यत नकाशात असलेला रस्ता दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांच्या आठ मुठ्या धोरणामुळे गेल्या ९ महिन्यापासून बंद केला आहे. रस्तात जेसीबीने पंधरा पंधरा फूटावर खडडे खोदून बंद केला आहे तो तत्काळ चालू करावा या आशयाचे निवेदन नायब तहसिलदार श्री जाधव साहेब यांच्याकडे ऊंबर्डे ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आले आहे.
           दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नकाशामध्ये या रस्त्याची रितसर नोंद असून हा रस्ता गेली ९ महिन्यापासून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात, गावात तर शाळेत जाणारी शाळकरी मुले, खोतवस्तीवरील एखादे मयत स्मशानभूमीपर्यंत नेण्याकरिता अडचण होत असून वारंवार सुचना करून सुध्दा ग्रामपंचायत लक्ष देत नसून या रस्त्यासंदर्भात प्रशासनाने पण कानाडोळा केला असून खटावचे तहसिलदार किरण जमदाडेसाहेब यांनी या प्रकरणात लक्ष घालून हा खोत वस्तीमधील रस्ता सिटी सर्वेप्रमाणे खुला करून द्यावा व ऊंबर्डे ग्रामस्थांची होणारी गैरसोय थांबवावी. अन्यथा वडूज - कराड रोडवर आम्ही सर्व ग्रामस्थ आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. माजी सरपंच भानुदास पवार, कार्यकारी पोलीस पाटील अशोक पवार, निवृत्त शिक्षक उत्तम पवार सर, ग्राप माजी सदस्य पोपट पवार, धनाजी वामन पवार, विठ्ठल पवार, दिपक पवार, विजय पवार, नितीन पवार, गणेश पवार, सोमनाथ पवार, नवनाथ पवार, बाळासो पवार, रमेश पवार, मंगेश पवार, भाऊसाहेब पवार, रविंद्र पवार आदिच्या दिलेल्या निवेदनावर सहया आहेत.

फोटो -रविना यादव.
ऊंबर्डे - नायब तहसिलदार श्री जाधव साहेब यांना निवेदन देताना ग्रामस्थ.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads