नोकरीविषयक
IAF GROUP C Recruitment: चला 12वी पास, 12वी पास! सरकारी नोकरी, सरकारी नोकरी!!
आयएएफ ग्रुप सी रिक्रुटमेंट 2022: सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी भारतीय हवाई दलाकडून (Indian Air Frorce) एक आनंदाची बातमी आहे.
हवाई दलाने हवाई दलाच्या अभिलेख कार्यालयात ग्रुप सी नागरी भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या पदांसाठी बारावी पास (12th Pass Candidates) उमेदवार ऑफलाइन अर्ज (Offline Application) करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2022 आहे. या पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी आणि वैद्यकीय चाचणीच्या आधारे केली जाणार आहे. या भरतीविषयी सविस्तर जाणून घेऊयात.या पदांसाठी मान्यताप्राप्त बोर्डातील 12 वी पास उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. संगणकाचेही ज्ञान असले पाहिजे. सर्व पदांसाठी 18 ते 25 वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. नोटिफिकेशनमध्ये याबाबत अधिक माहिती मिळेल.
पदांची संख्या – 04
Unreserved Category- 01
OBC- 01
SC- 02
महत्त्वाचे
पदाचे नाव – Lower Division Clerk (LDC)
अर्ज करायची पद्धत – ऑफलाईनअर्ज करायची शेवटची तारीख – 21 जून 2022
Notification – CLICK HERE
Offical Website – CLICK HERE
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा
मान्यताप्राप्त बोर्डातील 12 वी पास उमेदवार अर्ज करण्यास पात्र
संगणकावर इंग्रजीमध्ये प्रति मिनिट ३५ शब्द किंवा हिंदीमध्ये ३० शब्द प्रति मिनिट असे टायपिंग करता यावं
संगणकाचे ज्ञान असले पाहिजे
18 ते 25 वर्षे वयोमर्यादा
28 नोव्हेंबर 2021 च्या आधारे वयाची गणना केली जाईल
अशी असेल निवडीची प्रक्रिया
अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गुणवत्तेच्या आधारे हवाईदल उमेदवारांची छाननी करणार आहे. या यादीत स्थान मिळवणाऱ्यांना लेखी परीक्षेसाठी कॉल लेटर पाठवण्यात येणार आहे. लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी आणि वैद्यकीय चाचणी उत्तीर्ण झालेल्यांना डॉक्युमेंट वेरिफिकेशन केल्यानंतर नोकरी मिळेल.
असा अर्ज करू शकतो
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना या भरतीची नोटिफिकेशन आणि अर्ज खरेदी करावा लागणार आहे. यानंतर त्यांना फॉर्म भरून संबंधित पत्त्यावर त्यांच्या सर्व आवश्यक कागदपत्रांच्या फोटोकॉपीसह पाठवावे लागणार आहे. या भरतीबाबतची सविस्तर माहिती तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये मिळेल.
अर्ज पाठवण्याचा पत्ता
Presiding Officer, Civilian Recruitment Board, Air Force Record Office, Subroto Park, New Delhi- 110010
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा