अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट वन्यप्राण्याचा मृत्यू - दैनिक शिवस्वराज्य

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट वन्यप्राण्याचा मृत्यू

समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
सोलापूर, दि. 28 : सोलापूर वन विभागाअंतर्गत वनपरिक्षेत्र मोहोळमधील शिराळ येथे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग 65 लगत असलेल्या शेतामध्ये बिबट हा वन्यप्राणी मृत अवस्थेत आढळून आल्याची घटना शुक्रवारी (दि.24 जून) रोजी घडली.

            पुणे-सोलापूर महामार्ग क्रमांक 65 टेंभूर्णीपासून अंदाजे 8 कि.मी. शिराळ येथील राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या दत्तात्रय विठ्ठल लोकरे यांच्या शेताच्या बांधावर बिबट वन्यप्राणी मृत अवस्थेत आढळून आला आहे.  बिबट या वन्यप्राण्याचे वय अंदाजे 3 ते 5 वर्षे आहे. घटनास्थळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कदम, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मयुर देडे-पाटील व पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सत्यजीत पाटील या डॉक्टरांच्या चमुने सहाय्यक वनसंरक्षक रोहयो  एल.ए. आवारे, वनपरीक्षेत्र अधिकारी सतीश उटगे, मानद वन्यजीव रक्षक भरत छेडा,  अशासकीय संस्थेचे सदस्य शाकीर अ. जमादार यांचे समक्ष मृत बिबट वन्यप्राण्याचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदन अहवालामध्ये बिबट या वन्यप्राण्याचा मृत्यू हा अज्ञात वाहनाच्या धडकेने झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

            याप्रकरणी वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 2(16).9,39R/W 57 अन्वये प्राथमिक वनगुन्हा क्रमांक WLP -02/ दिनांक 24.06.2022 अन्वये अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वन गुन्ह्याचा पुढील तपास उपवनसंरक्षक धैर्यशिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक एल.ए. आवारे हे करीत आहेत.


Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads