सोलापूर अॕम्युचर खो-खो असोसिएशनच्या सचिवांनी दिली न्यु गोल्डन क्रिडा मंडळास भेट.. - दैनिक शिवस्वराज्य

सोलापूर अॕम्युचर खो-खो असोसिएशनच्या सचिवांनी दिली न्यु गोल्डन क्रिडा मंडळास भेट..


समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतिनिधी 
 सोलापूर (मंद्रूप) : सोलापूर जिल्हा अॕम्युचर खो - खो असोसिएशनचे सचिव सुनील चव्हाण यांनी मंद्रुप येथील न्यु गोल्डन स्पोर्ट्स क्लब तथा क्रिडा मंडळास भेट देऊन सर्व खेळाडूंना मार्गदर्शन करून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. 
          मंद्रुप सारख्या ग्रामीण भागातून मागील १३ वर्षापासून न्यु गोल्डन स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून अनेक खो-खो खेळाडू हे सोलापुर जिल्हा व राज्य पातळीवर उत्तम कामगिरी केले असुन पुढील काळात देखील उत्तम कामगिरी करतील असे प्रतिपादन सोलापूर जिल्हा अॕम्युचर खो - खो असोसिएशनचे सचिव सुनील चव्हाण यांनी केले. 
      यावेळी उत्कर्ष क्रिडा मंडळाचे खजिनदार, उमाकांत गायकवाड, शहेंनशाह मुजावर (सर), शहर पोलीस दलातील अर्जुन पवार, रमेश पवार, न्यु गोल्डन स्पोर्ट्स क्लबचे संस्थापक बबलु शेख, कर्णधार सोहेल कादर, प्रशिक्षक महमद नदाफ, फयाज बागवान, यांच्यासह न्यु गोल्डन स्पोर्ट्स क्लबचे सर्व खेळाडू उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads