महाराष्ट्र
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन
सलीम पटेल मोहोळ प्रतिनिधी सोलापूर (मोहोळ) :
अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांचे कार्यालयावर भव्य मोर्चा आयोजित केला होता माननीय जिल्हाधिकारी दिलीप स्वामी व कार्यक्रमाधिकारी जावेद शेख यांना निवेदन दिले मोर्चात अंगणवाडी सेविका दिपाली ढोबळे व इतर सर्व सेविका मिनी अंगणवाडी सेविका तसेच राज्य कार्याध्यक्ष सूर्यमनी गायकवाड सरचिटणीस सरलाताई गायकवाड मदतनीस यांचा सहभाग होता त्यामध्ये त्यांच्या प्रमुख मागण्या खालील प्रमाणे
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेचा दर्जा द्या व तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात भाववाढ करा आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन यांच्या अर्धी रक्कम टेन्शन म्हणून लागू करा व सेवा समाप्त झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एकरकमी लाभ त्वरित देण्यात यावा त्यानंतर सी बी चे पैसे तसेच गणवेश यांचे पैसे व टी ए बिलाचे पैसे प्रोत्साहन भत्ता आणि गरम ताजा आहार शिजवून देण्यासाठी इंधनाचे पैसे वाढवून द्या व तसेच घर भाड्याचे अंगणवाडीची पैसे लवकरात लवकर द्या आणि योजनाबाह्य कामे बंद करा या प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा