महाराष्ट्र
सागर सिमेंट च्या वतीने "एक लाख, वही वाटप" कार्यक्रमाचा शुभारंभ बालाजी सरोवर सोलापूर येथे संपन्न...
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
सोलापूर दि. २९ जुन : सागर सिमेंट च्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना "एक लाख, वही वाटप" कार्यक्रमाच्या शुभारंभ आज बालाजी सरोवर सोलापूर येथे मोठ्या थाटात संपन्न झाला.
गेल्यावर्षी सुद्धा आम्ही शालेय मुलांना एक लाख वह्या वाटल्या होतो, यावर्षी पुनश्च एकदा या उपक्रमाचा शुभारंभ सोलापूरचे लोकप्रिय खासदार, ष. ब्र.मा.श्री.डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्याहस्ते करताना आनंद वाटला.
याप्रसंगी मंद्रुपचे प.पू. रेणुक शिवाचार्य महास्वामीजी, बसवारूढ मठाचे प.पू.श्री.शिवपुत्र महास्वामीजी, सागर सिमेंटचे CMO श्री.राजेश सिंग, जिल्हा परिषदेचे मुख्य लेखाधिकारी, मा.श्री.अजयसिंह पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त मा.श्री.माधव रेड्डी, बिल्डर असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मा.दत्ता मुळे,सागर सिमेंटचे आनंद लोणावत, सुरेश शर्मा, तसेच सागर सिमेंट परिवारातील डीलर्स, ट्रान्सपोर्ट आणि सर्व विद्यार्थी, शिक्षक, पत्रकार बांधव ,सागर सिमेंट परिवारावर प्रेम करणारे हितचिंतक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा