साने गुरुजी विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय अंत्रोळी येथे दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न.. - दैनिक शिवस्वराज्य

साने गुरुजी विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय अंत्रोळी येथे दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न..


समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
सोलापूर (मंद्रूप) : साने गुरुजी विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय अंत्रोळी या प्रशालेतील इयत्ता दहावी व इयत्ता बारावी सन २०२२ मधील प्रथम तीन क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष आनंदकुमार अंत्रोळीकर (मालक) व प्रमुख पाहुणे जोशी साहेब व तसेच संस्थेचे सचिव भीमराव परीक्षाळे सर, संस्थेचे संचालक मजनोउद्दीन पठाण काका यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.                           

     यावेळी इयत्ता दहावी मधील प्रथम क्रमांक- कर्वे ऐश्वर्या दादासाहेब , व्दितीय क्रमांक - कोळी माधुरी राजशेखर व सलगरे शोभा लक्ष्मण, तृतीय क्रमांक - व्हणमाने मोहिनी अंकुश .            
त्याचबरोबर उत्तेजनार्थ बक्षीस - ज्योती सुनील आवताडे , शेख अल्फिया नुरुद्दिनबाशा व कुंभार दीक्षा आप्पासाहेब या दहावीतील यशस्वी विद्यार्थ्यांचे व तसेच इयत्ता बारावी मधील प्रथम क्रमांक - शेख अफसाना काशीम व द्वितीय क्रमांक - शेख अलमास महामुद , तृतीय क्रमांक- व्हरे स्वागता विलास 
      या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्य देऊन सन्मान करण्यात आला. 
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जोशी साहेब यांनी पाच हजार रुपयांची पुस्तके कै. नानासाहेब अंत्रोळीकर अभ्यासिकेला दिले. व विकास सहकारी सोसायटी माजी चेअरमन शरद नागणे साहेब यांनीदेखील दोन हजार रुपयाचे पुस्तके अभ्याशिकेला सुपूर्त केली. 
  यावेळी संस्थेचे अध्यक्ष आनंदकुमार अंत्रोळीकर (मालक) यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा स्पर्धा परीक्षेची तयारी करावी त्यासाठी एमपीएससी यूपीएससी ची सर्व पुस्तके आपणास उपलब्ध करून दिली जातील व त्यासाठी किती जरी खर्च पुस्तकांसाठी आला तरी तो खर्च केला जाईल परंतु विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा आपल्या गावचे, आई - वडिलांचे नाव कमवावे असे आपल्या मनोगतातून व्यक्त केले. यावेळी संस्थेचे सचिव भीमराव परीक्षाळे सर यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, आता साने गुरुजी विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी लवकरच विज्ञान शाखा सुरू करण्यात येईल असे ते आपल्या मनोगतातून व्यक्त केले. व संस्थेचे संचालक मजनोद्दीन पठाण यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. 
यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक, शिक्षक, व शिक्षकेतर कर्मचारी , ग्रामस्थ, पालक बहुसंख्येने उपस्थित होते. 
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ साळुंखे सर, यांनी केले, तर आभार प्रदर्शन दत्तात्रय शिंदे सर यांनी मानले.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads