कुंभारी येथे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून "एक सायकल बहिणीसाठी" या उपक्रमांतर्गत कुंभारी केंद्रात एकूण 23 सायकलींचे वितरण.. - दैनिक शिवस्वराज्य

कुंभारी येथे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून "एक सायकल बहिणीसाठी" या उपक्रमांतर्गत कुंभारी केंद्रात एकूण 23 सायकलींचे वितरण..


समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर : दि. 23 ऑगस्ट रोजी कुंभारी ता. दक्षिण सोलापूर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून "एक सायकल बहिणीसाठी" या उपक्रमांतर्गत कुंभारी केंद्रात एकूण 23 सायकलींचे वितरण करण्यात आले. केवळ अंतर जास्त असल्याने ज्या विद्यार्थिनी शाळेत उपस्थित राहू शकत नाही त्या विद्यार्थिनींना एक सायकल भेट देवून शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठीचा जिल्हा परिषद सोलापूरच्या या नावीन्यपूर्ण उपक्रमाला कुंभारी गावासह संपूर्ण कुंभारी केंद्रातून मदतीचा हात मिळाला. कुंभारी केंद्रातील 20 शाळांच्या प्रत्येकी एक याप्रमाणे 20 सायकली व जिल्हा परिषद सदस्य अण्णाप्पा बाराचारे यांच्याकडून एक सायकल व मा. केंद्रप्रमुखा राजगुरू मॅडम यांच्याकडून दोन सायकलांची वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमााच्य अध्यक्षस्थानी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) किरण लोहार हे होते. 
 या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील , जिल्हा परिषद सदस्य अण्णाप्पा बाराचारे , सरपंचा स्मृती निकंबे मॅडम, उपसरपंच सुरज पाटील , तसेच कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी मल्हारी बनसोडे , शिक्षण विस्ताराधिकारी जयश्री सुतार मॅडम उपस्थित होते. 
 सदर कार्यक्रमाचे आयोजन केंद्रप्रमुख श्रीम. कुंदा राजगुरू मॅडम यांनी केले होते.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads