महाराष्ट्र
न्यू इंग्लिश स्कूल कुसूर विद्यालयाचे एन.एम.एम.एस परीक्षेमध्ये घवघवीत यश..
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर (कुसुर) : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी सन २००७-०८ पासून शिष्यवृत्ती योजना परीक्षा ही मानव संसाधन विकास मंत्रालय नवी दिल्ली यांचे मार्फत राबविली जात आहे. इयता आठवीतील आर्थिक दुर्बल घटकातील ज्या पालकांचे उपन्न दीड लाखापेक्षा कमी आहे व जे विद्यार्थी अनुदानित शाळेत शिकत असतात अशा विद्यार्थ्यांना परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे सदर शिष्यवृत्तीचे वाटप केले जाते. प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या प्रज्ञेची जोपासना करणे, तसेच त्यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण व्हावे हा या योजनेचा गाभा आहे. या प्रज्ञावान विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवृत्तीच्या स्वरुपात आर्थिक मदत करण्यात येते वसदर शिष्यवृत्ती बारावी पर्यंत दिली जाते.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचे मार्फत दिनांक १९ जून २०२२ रोजी घेण्यात आलेल्या या परीक्षेतील शिष्यवृत्तीस पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची निवड यादी नुकतीच जाहीर करण्यात आली. यामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल कुसूर विद्यालयातील आठ विद्यार्थी पात्र झाले आहेत.
१) कु. प्रज्ञा दिनकर वाघमारे
२) कु. स्मृति लक्ष्मण घाडगे
३) कु. आकांक्षा माळप्पा व्हनमराठे
४) अमोल अप्पासाहेब कोळी
या चार विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड झालेली आहे. प्रत्येक विद्यार्थ्यास अठ्ठेचाळीस हजार रुपये शिष्यवृत्ती भेटणार आहे. ही एकूण रक्कम एक लाख ब्याण्णव हजार रुपये होते. या शिष्यवृत्तीत विद्यार्थी बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करू शकतात. संस्थेचे संस्थापक डॉ. कर्मवीर भाऊराव पाटीलांना अपेक्षित असलेल्या शिक्षण पद्धतीस अनुसरून आज हे विद्यार्थी खर्या अर्थाने स्वावलंबी बनले आहेत.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने हे विद्यालय नेहमीच विविध उपक्रम राबवित असते. भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाकडून इन्स्पायर अवॉर्डसाठी या विद्यालयातील विद्यार्थ्यांची सन २०१९-२० आणि २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाकरिता सलग दोन वर्षे राज्यस्तरासाठी निवड झालेली आहे. तसेच एस.एस.सी.परीक्षेतील प्रत्येक वर्षाचा निकाल शेकडा शंभर आहे. शैक्षणिक गुणवत्तावाढी बरोबर विविध सहशालेय उपक्रम वर्षभर रबिविले जातात आणि विद्यालयाचा प्रगतीचा आलेख नेहमीच चढता ठेवला आहे.
विद्यालयाचे मुख्याध्यापक आझाद आदम काझी यांचे प्रोत्साहन व विभाग प्रमुख शेख ए.आय. यांचे नियोजन आणि मार्गदर्शन तसेच दिनेश जाधव, सचिन पाटील, भीमाशंकर सोनगे, संतोष पाटील, रशीद शेख यांच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळविलेले हे यश पाहून कुसूर परिसरातून या विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक होत आहे.
या यशस्वी विद्यार्थ्याचे आणि विद्यालयाचे अभिनंदन रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील , सचिव विठ्ठल शिवणकर, विभागीय चेअरमन संजीव पाटील, सहसचिव राजेंद्र साळुंखे, विभागीय अधिकारी सुरेशकुमार गोडसे, स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य बाळप्पा कल्लप्पा नांगरे मामा, कुसूरचे उपसरपंच संतोष माशाळे , आजी माजी विद्यार्थी, परिसरातील ग्रामस्थ व पालक वर्ग, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन आणि विद्यालयाचे मार्गदर्शक सुनिल नांगरे यांनी केले.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा