गणेशोत्सव मंडळ पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्यास 2 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ - दैनिक शिवस्वराज्य

गणेशोत्सव मंडळ पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्यास 2 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ


समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार सांस्कृतिक कार्य विभागाने यावर्षी गणेशोत्सवासाठी उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी निवड करण्याची कार्यपध्दत निश्चित केली आहे.गणेशोत्सव मंडळांना ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 30 ऑगस्ट 2022 दिली होती, स्पर्धेत जास्तीत जास्त गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्यासाठी अर्ज भरण्याची मुदत 2 सप्टेंबर 2022 पर्यंत वाढविण्यात आली आहे. याबाबतचे शुद्धीपत्रक शासनाने जाहीर केले आहे.

स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गणेशोत्सव मंडळाने सदर अर्ज भरुन mahotsav.plda@gmail.com या

ईमेलवर 2 सप्टेंबर 2022 पूर्वी ऑनलाईन पाठवावेत. प्रकल्प संचालक, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी मुंबई यांनी सदर अर्जाची जिल्हानिहाय विभागणी करुन संबंधित जिल्हाधिकारी यांना त्यांच्या ईमेलवर दि. 3 सप्टेंबर 2022 दुपारी एक वाजेपर्यंत अर्ज उपलब्ध करुन द्यावेत. यासाठी प्रत्येक जिल्हाधिकारी यांनी स्वतंत्र ईमेल तयार करुन प्रकल्प संचालक, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांना त्यांच्या

pldeshpande१११@gmail.com ईमेल वर कळवावे, असेही शुद्धीपत्रकात म्हटले आहे.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads