जिल्ह्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पुरस्काराबाबत जिल्हास्तरीय समिती स्थापन... - दैनिक शिवस्वराज्य

जिल्ह्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पुरस्काराबाबत जिल्हास्तरीय समिती स्थापन...


समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर : गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळाना राज्य शासनाकडून पुरस्कार देण्यात येणार आहेत. पुरस्काराबाबत निवड करण्यासाठी कार्यपध्दत निश्चित करण्यात आली आहे. जिल्हास्तरीय पुरस्काराबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी समिती स्थापन केली आहे.

ही समिती स्पर्धेमध्ये सहभागी गणेशोत्सवस्थळी प्रत्यक्ष भेट देणार आहे. समितीमध्ये उपजिल्हाधिकारी अनिल कारंडे अध्यक्ष असतील. इतर शासकीय/शासनमान्य कला महाविद्यालयाचे प्रतिनिधी प्राचार्या प्रतिभा धोत्रे, कला व्यवसाय केंद्र, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी अजित पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव, पोलीस अधिकारी राखीव पोलीस निरीक्षक आनंद काजुळकर हे सदस्य म्हणून काम पाहतील. समिती व्हीडिओ व आवश्यक कागदपत्रे गणेशोत्सव मंडळाकडून प्राप्त करून घेईल. प्रत्येक मंडळांना भेटी देऊन तक्त्यानुसार गुणांकन करून एका गणेशोत्सव मंडळाची शिफारस राज्य स्तरावर पाठवतील.

या स्पर्धेत धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलीस स्टेशन यांची किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येईल.

खालील निकषाच्या आधारे पुरस्कारासाठी निवड करण्यात येईल. गुणांकनासाठी बाबी पुढीलप्रमाणे- पर्यावरणपूरक मुर्ती -१० गुण,पर्यावरणपूरक सजावट (थर्माकोल / प्लॅस्टिक इ. साहित्य विरहीत)-१५ गुण, ध्वनी प्रदूषण रहित वातावरण -५ गुण, पाणी वाचवा, मुलगी वाचवा, अंधश्रध्दा निर्मुलन, सामाजिक सलोखा इ. समाज प्रबोधन विषयावर देखावा / सजावट- २० गुण, स्वातंत्र्य चळवळी संदर्भातील देखावा / सजावट- 25 गुण, रक्तदान शिबीर, वैद्यकिय सेवा शिबीर इ. कार्य- 10 गुण, शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी / विद्यार्थीनी यांच्या शैक्षणिक / आरोग्य / सामाजिक इ. बाबत केलेले कार्य -१० गुण, महिला, ग्रामीण भागातील वंचित घटक यांच्या शैक्षणिक / आरोग्य / सामाजिक इ. बाबत केलेले कार्य- 10 गुण, पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम / स्पर्धा-10 गुण, पारंपरिक / देशी खेळाच्या स्पर्धा-10गुण, गणेश भक्तांसाठी देत असलेल्या प्राथमिक सुविधा (पाणी / प्रसाधन गृहे, वैद्यकिय प्रथमोपचार, परिसरातील स्वच्छता, वाहतूकीस अडथळा येणार नाही असे नियोजन, आयोजनातील शिस्त इ. (प्रत्येक सुविधेस ५ गुण-25गुण, असे एकूण-१५०
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads