महाराष्ट्र
शिवछत्रपती रंगभवन सभागृह येथे ‘वंदे मातरम’ ह्या देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन...
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
सोलापूर :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षाच्या निमित्ताने जिल्हा प्रशासनातर्फे ‘वंदे मातरम’ मराठी व हिंदी देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन बुधवार दि.10 ऑगस्ट 2022 रोजी सायंकाळी 5.00 वाजता शिवछत्रपती रंगभवन सभागृह येथे करण्यात आलेले आहे. हा कार्यक्रम प्रा.श्री. श्रीकांत येळेगांवकर यांच्या प्रमुख उपस्थित तसेच जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमासाठी सर्व अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव व निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी केले आहे.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा