गुरूवारी निर्मलकुमार फडकुले सभागृहात रानभाजी महोत्सवाचे आयोजन... - दैनिक शिवस्वराज्य

गुरूवारी निर्मलकुमार फडकुले सभागृहात रानभाजी महोत्सवाचे आयोजन...


समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
सोलापूर : शेतशिवारातील रानभाज्यांचे आरोग्यातील महत्व सर्वसामान्य नागरिकांना होण्यासाठी उद्या दि.11 ऑगस्ट 2022 रोजी डॉ.निर्मलकुमार फडकुले सभागृह येथे सकाळी 10 वाजता रानभाजी महोत्सवाचे आयोजन केल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा आत्माचे प्रकल्प संचालक बाळासाहेब शिंदे यांनी दिली.
     जिल्ह्यातील रानभाजी महोत्सव जिल्हास्तर आणि उत्तर व दक्षिण सोलापूर तालुक्यांचा एकत्रित होत आहे. महोत्सवाचे उद्घाटन जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी आणि इतर मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. आरोग्याला फायदेशीर असणाऱ्या रानभाजी महोत्सवाचा लाभ नागरिकांनी घेण्याचे आवाहन श्री. शिंदे यांनी केले आहे.


Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads