एम. एम. शेख फाउंडेशन व सहारा एजन्सीचे संस्थापक महमदयासिन मुबारक शेख यांच्याकडून महाराणा प्रताप हायस्कुल मधील विद्यार्थ्याना शालेय गणवेश वाटप - दैनिक शिवस्वराज्य

एम. एम. शेख फाउंडेशन व सहारा एजन्सीचे संस्थापक महमदयासिन मुबारक शेख यांच्याकडून महाराणा प्रताप हायस्कुल मधील विद्यार्थ्याना शालेय गणवेश वाटप


समीर शेख प्रतिनिधी
कोल्हापूर :75 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून एम. एम. शेख फाउंडेशन व सहारा एजन्सीचे सर्वेसर्वा महमदयासिन मुबारक शेख सर यांच्याकडून कोल्हापूर मधील महाराणा प्रताप हायस्कुल दुधाळी येथे शालेय गणवेश वाटप करण्यात आले.

या शाळेत अत्यंत गरीब कुटुंबातील विद्यार्थी शिकतात 2019 व 2021 मधील महापुरात शाळेचे मोठे नुकसान झाले.
त्यातून सावरण्यासाठी समाजातील इतर सामाजिक संस्थानी शालेय साहित्याची मदत केली. आपणही समाजाचे काही देणे लागतो त्यामुळे आपणच आपल्या लोकांना मदत केली पाहिजे हा विचार घेऊन पुढे जाणारे एम. एम. शेख सर व त्याची टीम कार्यरत आहे त्याचाच एक भाग म्हणून आज ही मदत केलेली आहे

यावेळी एम एम शेख फाउंडेशनचे संस्थापक महमदयासिन शेख सर, बिल्डर प्रकाश मोरे, दैनिक शिवस्वराज्यचे संपादक विकास पाटील, दैनिल सकाळचे पत्रकार सचिन चौगले, शरण दंडगुले, व शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षिका व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads