महाराष्ट्र
कोल्हापूर येथील कोरगांवकर हायस्कूलमध्ये गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप अभ्यास हेच अंतिम सत्य मानून मेहनत केल्यास यशश्री गगनास गवसणी घालते :- पंकज इंगळे
समीर शेख प्रतिनिधी
कोल्हापूर : कोल्हापूर येथील आंतरभारती शिक्षण मंडळ संचलित कोरगांवकर हायस्कूलमध्ये गरजू आणि होतकरु शंभर विद्यार्थ्यांना एम . एम. फाउंडेशन आणि अरुण पाटील, बँक ऑफ बडोदाचे मुख्य प्रबंधक पंकज इंगळे, शशिरेखा हेगडे, उद्योजक रवी मुळीक, सीएनसी सव्हिसेसचे सुरेश काकडे, भूषण बंड यांच्या संयुक्त विद्यमानेआज कोरगांवकर हायस्कूल मध्ये शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले . प्रारंभी प्रास्ताविक व स्वागत शाळेचे मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांनी केले त्यांच्या हस्ते पाहुण्यांचा तसेच मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .पाहुण्यांचा परिचय पर्यवेक्षिका वृषाली कुलकर्णी यांनी करून दिला . सूत्रसंचालन सिद्धी कपिलेश्वरी यांनी तर सुरेखा मोरबाळे यांनी आभार प्रदर्शन केले .
प्रमुख पाहुणे एम . एम . शेख यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या आड येणारे घटक दुर्लक्षून मेहनत केल्यास दातृत्व स्वतःहून तुमच्याकडे येते असे सांगितले . बँक ऑफ बडोदाचे मुख्य प्रबंधक पंकज इंगळे यांनी अभ्यास हेच अंतिम सत्य मानून मेहनत केल्यास यशश्री गगनास गवसणी घालते असे मनोगत व्यक्त केले .
यावेळी शाहू कॉलेजचे प्रा . डॉ .बाबुराव घुरके, प्रकाश मोरे, विनोद चोपडे, सचिन चौगुले, प्रभूप्रसाद रेळेकर, सदाशिव -हाटवळ आदी मान्यवर उपस्थित होते .
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा